pune university sakal
पुणे

‘स्टिक’ उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उद्योग क्षेत्राशी कनेक्ट!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत राबविणार ‘स्टिक’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तरुणांना रोजगार मिळावा, तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यामार्फत ‘स्मार्ट ट्रेनिंग आणि इनोव्हेशन सेंटर’ (स्टिक) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच नव्या तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

‘स्टिक’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी संकेतस्थळ : http://www.sticonline.in

‘इंडस्ट्री ४.०’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘स्मार्ट ट्रेनिंग आणि इनोव्हेशन सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच या सेंटरची बैठक विद्यापीठात झाली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, तसेच पर्सिसस्टंट कंपनीचे अधिकारी कल्पना कुडलिंगर आणि गोपाल थत्ते, सायनेक्रोनचे नरेश रेड्डी, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख तसेच ७० हुन अधिक स्पर्धक बैठकीला उपस्थित होते.

‘‘स्टिक या ऑनलाईन व्यासपीठासाठी विद्यापीठाने अनेक कंपन्यांचे सहकार्य घेतले आहे. याद्वारे नव्या तंत्रज्ञानावर आधारित अनेक पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये ऑटो कॅड, सॅप, लिनक्स, क्लाउड असे तंत्रज्ञान वापरले आहे. हे जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत, असे डॉ. उमराणी यांनी सांगितले. डॉ. पालकर म्हणाल्या,‘‘वेगाने बदलणाऱ्या काळात एकाच विषयाचे ज्ञान पुरेसे नसून बहुअंगी विकास आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण ही सुद्धा निरंतर बदलती प्रक्रिया झाली आहे. हे सतत बदलणारे अद्ययावत ज्ञान आणि कौशल्य ‘स्टिक’ उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील सेतू बांधण्याचे काम विद्यापीठाकडून केले जात आहे.’’

उद्योगांना केवळ पदवीधर नाही तर तंत्रज्ञानातील आवश्यक कौशल्यांसह क्रिटिकल थिंकिंग, संवाद कौशल्य, नवसंकल्पना, समस्या सोडविणे, अशा कौशल्यांची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे ‘स्टिक’ सारख्या उपक्रमाची भविष्यात आवश्यकता असल्याचे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

‘‘विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच काळानुसार अद्ययावत ज्ञान देण्यासाठी ‘स्मार्ट ट्रेनिंग आणि इनोव्हेशन सेंटर’ (स्टिक) व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न करत येत आहे. आगामी काळात हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ‘गेम चेंजर’ ठरतील. या उपक्रमातंर्गत देण्यात येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक करणे गरजेचे आहे.’’

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT