then police will allow construction even after 7 pmthen police will allow construction even after 7 pm.jpg 
पुणे

चांगली बातमी : पुण्यात संध्याकाळी सातनंतरही बांधकामांना मिळू शकते परवानगी !

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे निर्माण करावे लागलेले 'कंन्टेनमेंट झोन' सोडून इतर ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत बांधकाम सुरु करता येईल," अशी स्पष्ट ग्वाही पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी  येथे दिली. आवश्यकता असेल तर सायंकाळी  7 नंतरही बांधकामांना पोलिस परवानगी देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

'नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपर्स काऊंसील' (नरेडको) च्या वतीने बांधकाम क्षेत्राचे काम सुरळीतपणे सुरु व्हावे व व्यावसायिकांच्या सर्व शंकांचे निरसन व्हावे म्हणून आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. 'नरेडको’ चे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या चर्चासत्रात संपूर्ण राज्यातून १३०० व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी 'नरेडको’ चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजन बांदेलकर, पुणे अध्यक्ष राजेंद्र पाटे, 'नरेडको’चे कमिटी सदस्य अतुल गोयल, मुकेश येवले, भरत अग्रवाल, अभय केले, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जेडब्लुचे उमेश जोशी, वास्तुविषारद मनोज तातूस्कर आदि सहभागी झाले होते. 

काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी​

व्यावसायिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना डॉ. वेंकटेशम म्हणाले, "कन्टेनमेंट झोन वगळता बांधकामासाठी आवश्यक साहित्यांचे दळवळण करण्यास परवानगी आहे. परंतु 'कन्टेनमेंट झोन'मध्ये प्रवास किंवा कोणत्याही प्रकारचे काम करता येणार नाही. त्याचप्रमाणे अभियंता, आरसीसी कन्सल्टन्ट, वास्तुविशारद आणि विशेष कामगार कन्टेनमेंट झोन वगळून आपले घरुन इतर बांधकाम क्षेत्रावर जाऊ शकतात. वास्तुविशारद, आरसीसी व इतर कन्सल्टन्ट यांनी कमीतकमी कर्मचाऱ्यांसह डिझाईन ड्रॉईंगचे काम त्यांचे ऑफिसमध्ये करण्यास परवानगी देता येईल." "त्याचप्रमाणे जर कोणा व्यावसायिकाला सायंकाळी ७ नंतर काम चालू ठेवायचे असल्यास त्यासाठी त्यांना पोलिसांची विशेष परवानगी घ्यावी लागेल. गरज ओळखून ही परवानगी तासाभराच्या आत देण्यात येईल. शिवाय सर्व सुरक्षेची खबरदारी घेऊनही कामगारांमध्ये कोणी कोरोनाचा रुग्ण सापडल्यास व्यावसायिकावर कोणताही फौजदारी खटला दाखल होणार नाही." असेही त्यांनी सांगितले. 

पुणेकर दारूसाठी अपाॅइंटमेंट घेण्यातही आघाडीवर

नागरी प्राधिकरणाच्या निदर्शनांनुसार सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे, असे मत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "बांधकाम पुन्हा सुरु करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र मधुमेह रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने सर्व व्यावसायिकांनी मधुमेही कामगारांना कामावर न येण्याची समज द्यावी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT