Construction
Construction 
पुणे

बांधकाम प्रकल्प, कामगारांना पुरस्कार देणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘बांधकाम साइट्‌सवरील अपघात कमी होण्यासाठी कामगारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून लवकरच पुरस्कार सुरू करणार आहोत,’’ अशी माहिती घोषणा क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी दिली. 

क्रेडाई पुणे मेट्रो व कोलते-पाटील ग्रुपतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे, तसेच कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सरकारी कामगार अधिकारी समीर चव्हाण, पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी विजय महाजन, इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेचे प्रांत व्यवस्थापक सिद्धेश गिरी, इंडिया पोस्टचे वरिष्ठ सुपरवायझर मुकुंद बडवे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अमोल भुमकर, कोलते- पाटील डेव्हलपर्सचे बिझनेसप्रमुख राहुल तळेले, उपमहाव्यवस्थापक मंगेश शेंडे, सुरक्षा व्यवस्थापक मानस प्रधान, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर उपस्थित होते. 

या वेळी संजय शेडगे, विजय प्रकाश, अभिजित मोरे, जगदीश गिरी, गणेश पाटील या कामगारांसह इतरांचे ऑनलाइन बॅंक खाते सुरू करण्यात आले. बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वापराचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच सरकारी विविध योजना, बॅंक खाते योजना, आपत्ती व्यवस्थापन आदींची या वेळी माहिती देण्यात आली. या वेळी श्रॉफ आणि चव्हाण यांची भाषणे झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT