tunnel sakal
पुणे

पुणे : पाषाण ते कोथरुड बोगद्यासाठी सल्लागार

कोथरूडमधून औंध, बाणेर जाण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरूडमधून औंध, बाणेर जाण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो, शिवाय वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या पाषाण-पंचवटी ते कोथरूडला या बोगद्याचे काम करण्यासाठी पूर्व-व्यवहार्यता अभ्यास (प्री-फीजिबिलिटी स्टडी) आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (एन्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. सुमारे ६ महिन्यात हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.(Pashan to Kothrud tunnel)

मोनार्च सर्व्हेअर अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या तज्ज्ञ सल्लागारांकडून करून घेतले जाणार आहे. या सल्लागार कंपनीस ७२ लाख ७० हजार रुपये शुल्क दिले जाणार आहे, असेस्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.कोथरूड, कर्वेनगर यासह इतर भागातील नागरिकांना औंध, पाषाण बाणेर भागात जायचे असेल तर सेनापती बापट रस्ता किंवा चांदणी चौकातून पाषाण रस्त्याने जावे लागते. हे अंतर जास्त असल्याने व वाहतूक कोंडीमुळे प्रवासात बराच वेळ जातो. शिवाय प्रदुषणही भर पडत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून पाषाण-पंचवटी ते कोथरूड येथील सुतारदरा असा बोगदा केला जावा याची चर्चा सुरू होती. गेल्या काही महिन्यात यास गती आली, महापालिकेने या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागवली होती. त्यामध्ये मोनार्च कंपनीला हे काम दिले आहे.(Monarch Surveyors & Engineering Consultants Private Limited)

'कोथरूडमधील सुतारदरा ते पाषाण पंचवटी दरम्यान सुमारे २ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. शिवाय भूसंपादनासाठीही मोठा निधी लागण्याची शक्यता आहे. या बोगद्याचा समावेश शहराच्या विकास आराखड्यात करण्यात आलेला आहे. कोथरूड, औंध, बाणेर, पाषाण परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.या बोगद्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे'च्या (डीआरडीओ) हद्दीमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिकेने संपूर्ण मार्गाच्या आखणीसाठी तयारी सुरू आहे. बोगद्याचा मार्ग निश्चित झाल्यानंतर संरक्षण आणि वन विभागाच्या जागांसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी या विभागांची व पर्यावरण विभागाची मान्यता मिळविण्याची जबाबदारीही या सल्लागार कंपनीची आहे.(Pune News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR नोंदणीच्या कामासाठी शिक्षक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; ERO, AERO ना मोठा दिलासा

Mhada Lottery: मुंबईकरांची गृहस्वप्नपूर्ती! म्हाडाच्या २,६४० घरांची सोडत जाहीर; पुढील लॉटरी कधी?

Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीचा पहिला हप्ता आजपासून जमा?; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत निर्णय शक्य

Hardik Pandya Deal: हार्दिकची CSK सोबतची डिल का फिसकटली? ऋतुराज गायकवाडचं नाव आलंय चर्चेत, Mumbai Indians च्या कॅप्टनच्या मागण्या वाचाल तर...

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT