court.jpg 
पुणे

ग्राहकांची न्यायासाठी सुरू असलेली प्रतिक्षा लवकरच संपणार....

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हा व सत्र आणि कौटुंबिक न्यायालयानंतर आता ग्राहक मंचाचे कामकाजही येत्या सोमवारपासून (ता. 8) सुरू होणार आहे. राज्यात रेड झोनमधील जिल्ह्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे, तर, उर्वरित सर्व जिल्हात नियमितपणे काम चालणार आहे. राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष ए.पी. भंगळे यांनी याबाबत आदेश काढला आहे. त्यामुळे ग्राहकांची न्यायासाठी सुरू असलेली प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. 

खरेदी केलेल्या वस्तुबाबत फसवणूक झाल्यास ग्राहकांना ग्राहक मंचात न्याय मागता येतो. ग्राहक आणि फसवणूक केलेल्या कंपनीची बाजू ऐकून घेऊन मंच निर्णय देत असते. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व न्यायालये बंद होती. त्यानुसार ग्राहक मंचही बंद होते. त्यामुळे लॉकडाउन काळात फसवणूक झाल्यावरही न्याय मागणे ग्राहकांना अवघड झाले होते. दाखल झालेल्या प्रकरणांना पुढील तारखा देण्यात येत होत्या.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता सर्व न्यायालये करोना संसर्गाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करून सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार ग्राहक मंचही सुरू होणार आहे. रेड झोनमधील जिल्ह्यात केवळ अर्जंट आणि अंतिम सुनावणीवर असलेल्या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी होणार असून, इतरत्र सुरळीत कामकाज सुरू होणार आहे. याविषयी ग्राहक मंचात प्रॅक्‍टीस करणारे वकील अॅड. पवनकुमार भन्साळी म्हणाले, मंच सुरू झाल्यामुळे ग्राहकांना आता लवकर न्याय मिळणार आहे. प्रलंबित प्रकरणावर लवकर सुनावणी होऊन निकाल लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT