Consumer-Protection-Act 
पुणे

ग्राहकांनी नवीन संरक्षण कायद्याच्या आधारे आठ महिन्यांत केल्या ३६६ तक्रारी दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे - ग्राहक व्याख्येची व्याप्ती वाढवत खरेदीदारांना अधिक संरक्षण पुरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन ग्राहक संरक्षण कायद्याला २० मार्च रोजी आठ महिने पूर्ण होत आहे. या कालावधीत पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये नवीन कायद्यातील तरतुदीनुसार ३६६ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

लॉकडाउनमध्ये आयोगातील सुनावणी व इतर कामकाज बंद होते. मात्र, ग्राहकांना ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे ऑनलाइन स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ५४ तर आक्टोबरमध्ये ६० आणि त्यानंतर जानेवारीमध्ये ६७ तक्रार अर्ज दाखल झाले. तब्बल ३८ वर्षांनंतर या कायद्यात बदल करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यामध्ये ऑनलाइन खरेदीबाबत ई-कॉमर्स अंतर्गत विशेष तरतूद करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक महिने इतर न्यायालयांप्रमाणे आयोगाचे कामकाज बंद होते. त्यामुळे तक्रारी प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले होते. अनलॉकमध्ये एका शिफ्टमध्ये आयोगाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यातील तांत्रिक अडचणींमुळे कामात व्यत्यय येत होता. मात्र, तरी देखील या काळात दावे जलद निकाली लागतील यासाठी प्रयत्न आयोगाकडून करण्यात आले. फेब्रुवारी २०२१ अखेर एक हजार ९२५ तक्रारी प्रलंबित आहेत.

ग्राहकांना एखादी वस्तू अशा माध्यमातून खरेदी करायची झाल्यास विक्रेत्याच्या अधिकृत ॲपमध्ये तपशील नोंदवावा. विक्रेत्यांशी वैध करार करून बँक खात्यातून रक्कम विक्रेत्यांकडे सुरक्षित आणि पारदर्शक प्रणालीद्वारे हस्तांतरित करून त्याची नोंद ठेवावी. 
- उमेश जावळीकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT