rush.jpg 
पुणे

पुणेकरांनो, रस्त्यावर भाजी खरेदी करताना केलेली गर्दी पडू शकते महागात...

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळणे हा कोरोनावरचा एकमेव प्रभावी उपाय आहे. परंतु, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विक्रीमुळे प्रचंड गर्दी होत आहे. रस्त्यांवर होणार्‍या विक्रीमुळे नजीकच्या सोसायट्यांची डोके दु:खी वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी कोरोनाचा विषाणूचा प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेऊन रस्त्यांवर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोसायट्यांचे पदाधिकारी करीत आहेत.
 पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...  

गुलटेकडी मार्केटयार्डातील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा आणि केळी विभाग खबरदारी म्हणून काही काळ बंद होता. परंतु, मागील 10 दिवसांपासून मार्केटयार्डातील फूल विभाग वगळता सर्व विभाग सुरू झाले आहेत. याठिकाणी बाजार समिती परिसरात प्रशासन, अडते, हमाल, तोलणार सर्व प्रकारची खबरदारी घेऊन काम करत आहेत. तर दुसरीकडे राजाराम पूल, दांडेकर पूल, गंगाधाम चौक, कोंढवा, गंगाधाम चौक ते इस्कॉन मंदिर चौक, कोथरूड, कर्वेनगर, वारजे ते एनडीए रस्ता, सातारा रस्ता, कात्रज चौक, कात्रज आंबेगाव रस्ता, कात्रज खडीमशीन चौक रस्ता, वडगाव पूल, फातिमा नगर चौक आदी ठिकाणी रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता सर्रासपणे भाज्या व फळांची विक्री सुरू आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

शहरात अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या समोर विक्री केली जात आहे. यामुळे तेथे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर आरडा-ओरडा होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. खरेदीसाठी गर्दी होते आहे. त्यातील अनेक लोक मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन व्यक्तीत अंतर बाळगले जात नाही. सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. उघड्यावर असलेल्या भाज्या आणि फळांना प्रत्येकजण हाताळून बघत असतो. विक्रीच्या ठिकाणी कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी रस्त्यांवरील धोकादायक खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ही विक्री थांबवण्याची मागणी सोसायट्यांचे पदाधिकारी करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गगन विहार, गगन गॅलक्सी, वर्धमानपूरा, गंगाधाम फेज 1, गंगाधाम फेज 2, इशाया यासह या भागातील सोसायट्यातील रविवाशांना रस्त्यावरील विक्रीचा मोठा त्रास होत आहे. गंगाधाम चौक ते इस्कॉन मंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर भाज्या व फळांची विक्री सुरू आहे. वाहने आणि हातगाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी होते. खरेदीसाठी येणारे लोकही रस्त्यावर वाहने लावतात. येथे रोजच ग्राहकांची गर्दी होते. मास्कचा वापर केला जात नाही. अंतर पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा धोका लक्षात घेता काही दिवस तरी रस्त्यांवरील विक्री थांबली पाहिजे. परिसरातील वाहतूक पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- सदाभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष, गंगाधाम सोसायटी.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT