controversial statement on chhagan bhujbal of parshuram seva-sangh state president vishwajit deshpande sakal
पुणे

Pune News : भुजबळांविरोधात व्यक्तव्य करणाऱ्या देशपांडेला अटक करा; समता परिषदेची मागणी

छगन भुजबळ यांच्या बाबत परशुराम संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे याने बदनामीकारक व्यक्तव्य केले

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : राज्याचे मंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्या बाबत परशुराम संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे याने बदनामीकारक व्यक्तव्य केले आहे. त्यामुळे समता परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देशपांडेला अटक करण्याची मागणी केली आहे.

समता परिषदेच्या वतीने आज (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशपांडे याच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले. त्याच्या विरोधात घोषणा देऊन निषेधही व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना भेटून निवेदन देण्यात आले.

समता परिषदेच्या महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे म्हणाल्या, "तरुणांना मारहाणीसाठी प्रोत्साहित करून बक्षीस जाहीर करणाऱ्या विश्वजीत देशपांडेला तातडीने अटक करून त्यावर गुन्हा दाखल करावा.'

सपना माळी म्हणाल्या, "देशपांडे हा मानसिक व विकृत रुग्ण असून त्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे.' विभागाध्यक्ष प्रितेश गवळी म्हणाले, "देशपांडे याने आमच्या नेतृत्वाबाबत केलेले वक्तव्य आमच्या अस्मितेवर घाला आहे. दिसेल तेथे त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.'

यावेळी कार्यकर्ते अविनाश चौरे, पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव, शिवराम जांभूळकर, सागर दरवडे, गौरी पिंगळे, संगिता माळी, प्रदीप हूमे, प्रदीप बनसोडे, महेश बनकर, सुधीर होले, नागेश भुजबळ, महेंद्र बनकर, विशाल बोरावके, हनुमंत टिळेकर, प्रतीक राऊत, उमेश म्हेत्रे, मुकेश वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

'विवेक मेरी माँ मर रही है' नॉन व्हेज खात शाहरुख मित्राला म्हणाला...'क्या तुम जानते हो विवेक?'

Pandharpur Kartiki Ekadashi: एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे वालेगावकर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Pune Lawyers Protest : वकील उद्या लाल फीत लावून कामकाज करणार, वकील संरक्षण कायद्याची मागणी

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT