पुणे

पुणे : सहकारी संस्थांच्या ऑनलाइनद्वारेच सभा

सहकार विभागाने असे आदेश जारी केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या (corona) प्रादुर्भावामुळे ५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन (Online) किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात याव्यात. तर, ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांनी (cooperatives) वार्षिक सभेचे आयोजन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे करावे, असे आदेश सहकार विभागाने जारी केले आहेत. (cooperatives Meetings online)

प्रत्येक सहकारी संस्थने वित्तीय वर्ष संपल्यापासून चार महिन्यांच्या कालावधीत लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांत वार्षिक सभा बोलावण्याची तरतूद आहे. परंतु राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे ५० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे. त्यामुळे २०२०-२१ मधील वार्षिक सर्वसाधारण सभा कशा घ्याव्यात, याबाबत सहकारी संस्थांमध्ये संभ्रमावस्था होती. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने शुक्रवारी (ता. ३०) आदेश जारी केले आहेत.

सहकारी संस्थांच्या ऑनलाइनद्वारेच सभा

त्यानुसार ५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसीद्वारे वार्षिक सभेचे आयोजन करावे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. संस्थेच्या प्रत्येक सभासदाला वार्षिक सभेची तारीख, वेळ, ठिकाण आणि लिंक याची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस, इ-मेल किंवा व्हॉटसअपद्वारे कळविण्यात यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावण्यात यावी. ज्या सभासदाने इ-मेल पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल, अशा सभासदांना सात दिवसांत पत्राद्वारे माहिती पोच करण्यात यावी. सर्व सहकारी संस्थांनी वार्षिक सभेच्या माहितीची जाहिरात एका स्थानिक वर्तमानपत्रात द्यावी. सभासदांनी इ-मेल किंवा मोबाईल क्रमांकाची सहकारी संस्थेकडे नोंद केली नसल्यास ती माहिती कोठे देणार, याबाबत सभासदांना माहिती द्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

उपस्थितीची नोंद ठेवणे आवश्यक

सहकारी संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या व्यक्तीच्या मदतीने किंवा एजन्सीची निवड करून त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे. वार्षिक सभेतील सदस्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवून, ते जतन करून ठेवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील, असे या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025 : वैभव सूर्यवंशीने गाजवले हे वर्ष! अनेक वर्ल्ड रेकॉर्ड, Google Search मध्ये अव्वल अन् राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Crime: फक्त २० रुपयांवरून वाद पेटला, पतीला राग अनावर झाला, आधी पत्नीला संपवलं नंतर..; धक्कादायक कृत्यानं गाव हादरलं

Latest Marathi News Live Update : मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन, 'मावळ केसरी' किताबासोबतच चांदीची गदा देण्याचा खास मान

शुटिंगदरम्यान जितेंद्र जोशीच्या गळ्याला बसलेला फास, अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगताना म्हणाला... 'स्टूल काढलं अन्...'

Salman Khan Birthday: टायगर, तुमचे प्रेम.... ! सलमानसाठी एक्स गर्लफ्रेंड कतरिनाची वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

SCROLL FOR NEXT