तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे सोमवारी एका पुरुषास कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील १४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या कुटुंबातील १० जणांचे कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी आर. डी. शिंदे व डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले.
निमगाव म्हाळुंगीत सोमवारी (ता.६) एका पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील १४ जणांचे घशातील स्त्राव आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी कोरोनाबाधित पुरुषाच्या कुटुंबातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच, आज तळेगाव ढमढेरे व कासारी येथे प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
एकाच कुटुंबातील ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पोलिस यांनी तातडीने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गाव प्रतिबंधित व बफर क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
ग्रामस्थांनी घाबरून न जाता, सर्वांनी कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी, तोंडाला मास्क लावावे, सॅनीटायझरचा वापर करावा, गर्दीत जाऊ नका, सामाजिक अंतर ठेवा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी आर. डी. शिंदे, सरपंच ज्योती शिर्के, पोलिस पाटील किरण काळे, ग्रामसेवक बी. बी. गोरे आदींनी केले आहे.
Edited By : Nilesh Shende
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.