पुणे

पुणे मार्केटयार्डमधील गर्दीला बसणार वेसण; ओळखपत्राशिवाय 'नो एन्ट्री'

शहरात कोरोना संसर्ग वाढत असतानाही श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील भाजीपाला बाजारात होणारी गर्दी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहरात कोरोना संसर्ग वाढत असतानाही श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील भाजीपाला बाजारात होणारी गर्दी कमी होण्याची चिन्हे नाहीत. अखेर सहपोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिसांची शुक्रवारी बैठक पार पडली. त्यामध्ये ठरल्यानुसार, किरकोळ खरेदीदारांना बाजारात प्रवेश देण्यात येणार नाही, तसेच बाजारातील अडते, व्यापारी, कामगार वाहनचालक, घाऊक खरेदीदारांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही बाजारात प्रवेश मिळणार नाही.

बाजार समितीच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत डॉ.शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यावेळी उपस्थित होते. मार्केटयार्डातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतीमालाची किरकोळ विक्री बंद केली जाणार आहे. तसेच अडते, व्यापारी, कामगार, हमाल, तोलणार, टेम्पोचालक , घाऊक खरेदीदार आदींना ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्राशिवाय बाजारात कोणालाच प्रवेश देण्यात येणार नाही. याबरोबरच मार्केटयार्डातील वाहनतळावरही ओळखपत्र असल्याशिवाय वाहनांना पार्कींगसाठी प्रवेश मिळणार नाही. बाजारआवारातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील प्रवेशद्वार क्रमांक सातमधून टेम्पोचालकांना प्रवेश देण्यात येणार असून प्रवेशद्वार क्रमांक एकमधून त्यांना बाहेर पडता येणार आहे. यापुर्वीप्रमाणे शनिवारी आणि रविवारी मार्केटयार्ड पूर्णपणे बंद राहणार आहे.

लॉकडाऊनमध्ये मार्केटयार्डातील विविध विभाग दिवसाआड पद्धतीने सुरू ठेवण्यात येत होते. सोमवारी बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने बाजारात फक्त ओळखपत्र असणाऱ्या घटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सोमवारी पहाटे मार्केटयार्डातील शिवनेरी रस्ता शेतीमाल वगळता अन्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मार्केटयार्डातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी वाहतूक शाखेचे पंधरा कर्मचारी तसेच पोलीस ठाण्यातील तीस कर्मचारी अशा एकूण 45 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिसांना मार्केटयार्डातील सुरक्षारक्षक व कर्मचारी बंदोबस्तास सहाय्य करणार आहेत. शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असल्याने भुसार बाजारात अन्नधान्य घेऊन येणारे ट्रक रांगेत लावण्यात येणार आहे. सोमवारी दुपारनंतर त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बाजार समितीकडून उपायोजना करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT