Doctor 
पुणे

शिरूरमधील डॉक्टरलाच कोरोना; अनेक रुग्ण संपर्कात

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) - शिरूर तालुक्यात आज कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याचे चित्र असून, दिवसभरात सहाजणांचे कोरोना चे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मात्र, शहरातील एका डॉक्टरलाच कोरोनाची बाधा झाल्याने व या डॉक्टरांच्या संपर्कात अनेक रूग्ण आल्याचा संशय असल्याने चिंतेचे ढग कायम आहेत. आजअखेर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ४६० झाला असून, त्याच्या बरोबर निम्मे म्हणजे २३० जण बरे झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरूर शहरात कुंभार आळी परिसरात ४२ वर्षीय पुरूषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एका ३८ वर्षीय वैद्यकीय व्यावसायिकाचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आल्याने शहरात घबराट पसरली. त्याचबरोबरच सणसवाडी येथील दोघांचा आणि रांजणगाव गणपती व विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांतली ही कोरोना बाधितांची कमी संख्या असली तरी एका डॉक्टरलाच बाधा झाल्याने आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे.                   

शिरूर तालुक्यात सणसवाडी येथे २८ मार्च ला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडला होता. त्यानंतर तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर येथून ख-या अर्थाने संसर्गाला सुरवात झाली. नंतरच्या टप्प्यात रांजणगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवडच्या हॉटस्पॉट मधून येणा-या कामगारांमुळे प्रादूर्भाव वाढला होता. 

दरम्यान, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर पुणे व विशेषतः मुंबई हून गावाकडे आलेल्या पाहुण्यांमुळे कोरोनाने उठाव घेतला. या पाहुणे मंडळींमुळे जवळपास तीस गावांत संसर्ग पोचला. मात्र, त्यानंतरचे बाधित हे एकमेकांच्या संपर्कातून वाढत गेले. निश्काळजीपणा, खबरदारीचा अभाव, बेफिकीरीतून तालुक्यात प्रादूर्भाव वाढत गेला. त्यातून आत्तापर्यँत एकूण ४६० जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील निम्मे म्हणजे २३० जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यु झाला असून, त्यातील केवळ एक महिला व एक पुरूष वगळता इतर सर्वजण साठीच्या पुढील व इतर आजार असणारे होते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील कोरोनाचा उगम, संसर्ग व प्रादूर्भाव विचारात घेता बरे होणाऱांची संख्या पन्नास टक्के असल्याचे आजवरच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. तर मृतांची संख्या पाच टक्के आहे. ग्रामीण भागातील जनतेत मूळातच असलेली प्रतिकार शक्ती यामुळे मृत्युचे प्रमाण कमी असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT