Pune Corona Update sakal
पुणे

पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात १६ हजार ३६२ नवे कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.२२) दिवसभरात १६ हजार ३६२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ११ हजार ९५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ९ कोरोना मृत्यू आहेत.(Pune Corona Update)

दिवसातील जिल्ह्यातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ८ हजार २४६ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ४ हजार ८७५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार ५०४, नगरपालिका हद्दीत ५५० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १८७ नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ५ हजार ४०० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ५६६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ४२१, नगरपालिका हद्दीतील ४३२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील नऊ मृत्यूबरोबरच पिंपरी चिंचवड व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी तीन कोरोना मृत्यू आहेत. शनिवारी दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८९ हजार ६७३ इतकी आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णांलयात २ हजार ८६६ जणांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित ८६ हजार ८०७ जण गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT