death.jpg
death.jpg 
पुणे

धक्कादायक ! पुण्यात बेड अभावी कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

रामवाडी (पुणे) : शनिवारी (ता. 11 ) कोरोना पॉझिटिव्ह असा रिपोर्ट् आला. ऑक्सिजनची पातळी खालवली होती. श्वास घेण्यास त्रास होत होता. लगेच दोन ठिकाणच्या खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे ही बेड उपलब्ध न झाल्याने शेवटी शास्त्रीनगर येथील खासगी दवाखान्यात भरती झाले. परंतु, त्या ठिकाणी बाह्य रुग्ण विभागात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. या ठिकाणी ही उपचारासाठी  बेड उपलब्ध न झाल्याने त्या रुग्णाचा  मृत्यू झाला. लोहगाव येथील संतनगर येथे राहणाऱ्या कोरोना बाधित रुग्ण (वय- 45) यांचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीला प्रथम ताप व अंगदुखीचा त्रास होत असल्याने घरी गोळी घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसऱ्या दिवशी बरे वाटले. त्यानंतर पुन्हा ताप सर्दी खोकला त्रास होत असल्याने  घराजवळील  डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतला. त्रास कमी न झाल्याने गुरुवारी त्याच डॉक्टरकडे गेले होते. धानोरीत टायफाईड व कोरोना यांची खासगी डॉक्टर कडून टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट् शनिवारी आला. त्यानंतर ते दोन्ही (रुबी हॉल व जहांगीर ) खासगी दवाखान्यात बेड उपलब्ध न झाल्याने एका हाॅस्पिटलमध्ये आले. तेथील बाह्य रुग्ण विभागात बेड उपलब्ध नसल्याने  बाह्यरुग्ण विभागात व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.

बेडची वाट पाहावी लागली. पण मिळाला नसल्याने शेवटी खराडी येथील एका हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला. पण त्या ठिकाणी घेऊन जाताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर ही हॉस्पिटलकडून मृत्यू दाखला देण्यास विलंब झाला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून समजली. तीन लहान मुली व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींची स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आली  आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT