Corona In Pune eSakal
पुणे

कोरोनाचा संसर्ग वाढला; वारजे कर्वेनगर भागात २३ मायक्रो कन्टेन्मेंट झोन

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने रुग्ण संख्या वाढल्याने महापालिकेने आता या परिसरात २३ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहेत.

विनायक होगाडे

वारजे माळवाडी : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने रुग्ण संख्या वाढल्याने महापालिकेने आता या परिसरात २३ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहेत. पालिकेचे सहायक आयुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोसायटीचे आवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. प्रत्येक व्यक्तीने नाक, तोंड व हनवटीचे खाली मास्क असला पाहिजे याबाबत दक्षता घ्यावी. संचारबंदी असताना एकत्र जमणे टाळावे. या नियमांचे पालन न केल्याबद्दल या परिसरातील व्यावसायिक, नागरिक यांच्याकडून आता पर्यंत तीन लाख 81 हजारांचा रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या प्रभागाच्या हद्दीत पाच किंवा त्या पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहिर केले जाते. अशी २३ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र या परिसरात आहेत. ती वारुळे यांनी जाहीर केली आहेत.

हेही वाचा - एसटी चालू ठेवल्याचा निर्णय दिलासादायक; विद्यार्थी, नोकरदारांनी धरली गावाकडची वाट

प्रतिबंधित क्षेत्र यादी पुढीलप्रमाणे :

  • कोथरूड- कर्वे रस्त्यावरील पिनाक गार्डन, करिष्मा व पिनाक पारिजात सोसायटी,

  • एरंडवणे- संकुल सोसायटी,

  • कर्वेनगर- चिंतामणी बिल्डींग, शाहू कॉलनी, लेन नं. ६, प्लॉट नं. १२,

  • व गोल्डन पेटल्स, दुधाने नगर,

  • वारजे माळवाडी- राहुल निसर्ग,, राहुल पार्क, चैतन्य नगरी, वारजे नाका- करण क्लासिया, हिल व्ह्यू, स्नेहा कॉम्प्लेक्स, आदित्य गार्डन सिटी, ईशान सृष्टी, ईशान संस्कृती, करण ग्रीन्स, पॉप्युलर प्रेस्टीज, पॉप्युलर नगर, तेजोवलय व रुणवाल मिडोज,

  • शिवणे- स्नेहा विहार, दांगट पाटील नगर, श्री स्वामी संकुल, शिवणे गावठाण, व ग्रीन सिटी,

हेही वाचा - पुणे तिथे काय उणे! ज्यांच्या घरी चोरी केली त्यांच्याबरोबरच चोरटा गेला सहकुटुंब जेवायला

प्रतिबंधित क्षेत्राची नियमावली
सोसायटीत अथवा घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल डिटेक्टरच्या साह्याने सोसायटीने तपासणी करावी. कोविडसाठी पल्स ऑक्सिमीटर तपासणी ही दिशादर्शक आहे. ऑक्सिजन पातळी ९४च्या खाली असल्यास त्यास त्वरित पुढील तपासणी करिता महापालिकेची रुग्णालये अथवा खाजगी डॉक्टर यांचेमार्फत तपासणी करून घेण्याच्या सुचना द्याव्यात. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र याठिकाणी राहणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती, १० वर्षाखालील मुले, विविध आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती यांची पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करा. त्यांची दैनंदिन नोंद ठेवावी. ऑक्सिजन पातळी ९४च्या खाली असल्यास त्यांची डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ स्वॅब टेस्ट करावी. स्वॅब टेस्ट वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत एस.एन.डी.टी. कॉलेज येथील RT- PCR स्वॅब सेंटर व कै.अरविंद बारटक्के हॉस्पिटल येथील Rapid Antigen टेस्ट सेंटर आहेत. याबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास आपले परिसरातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. कोविड १९ व्यतिरिक्त इतर आजारांकरिता रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांबाबतची माहिती कृपया warjekarvenagar@punecorporation.org या ई-मेल वर उपलब्ध करून द्यावी. कोविडचे अनुषंगाने माहितीचे विश्लेषण करून वैद्यकीय विभागामार्फत पुढील मदत उपलब्ध करून देता येईल. असे आवाहन देखील वारुळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: मेघगर्जनेसह धो-धो कोसळणार! 'या' 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

PM Modi Gold Appeal : मोदींच्या आवाहनानंतर सोन्यातील गुंतवणूक थांबली? साडेतीन मुहूर्ताच्या तोंडावर ग्राहकांनी सराफ बाजाराकडे का फिरवली पाठ?

Latest Marathi News Live Update : सी बी आयकडून पुण्यात तिघांची चौकशी सुरू, बँक खात्यांसह संपर्कातील व्यक्तींचाही तपास

मराठा उपसमिती बरखास्त करा अन् स्वतंत्र मंत्रालय द्या! मनोज जरांगेंनी सरकारकडे केल्या १० मागण्या; पाहा संपूर्ण यादी!

BCCI Fine CSK: चेन्नईच्या जखमेवर BCCI ने चोळले मीठ! ऋतुराज गायकवाडला एका चुकीसाठी मोजावे लागले तब्बल 'एवढे' लाख रुपये?

SCROLL FOR NEXT