पुणे

दौंडमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोना संसर्ग

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात एकाच कुटुंबातील सात सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. बाधितांच्या उपचारांसाठी अधिग्रिहत रूग्णालयांवर नियंत्रण नसल्याने काही रूग्णालयांकडून रुग्णांना अवास्तव बिलांची आकाराणी व वसुली सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड उप जिल्हा रूग्णालयात ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी एकूण १८५ जणांची रॅपिड अँटिजेन डिटेक्शन किटद्वारे कोरोना निदान तपासणी करण्यात आली. त्यापैकी  २८ जणांना बाधा झाली असून त्यामध्ये १८ पुरूष व १० महिलांचा समावेश आहे. बाधितांचे वयोमान २ ते ७५ दरम्यान आहे, अशी माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

दौंड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घराबाहेर पडणार्या नागरिकांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा केला जात आहे. अधिग्रहित रूग्णालयांकडून कोरोना निगेटिव्ह रूग्णांना पॅाझिटिव्ह रूग्णांच्या वॅार्डात दाखल करून त्यांच्याकडून किमान सत्तर हजार ते दीड लाख रूपयांपर्यंत बिलांची आकारणी केल्याचे प्रकार सुरू आहेत. या बाबत तहसीलदार संजय पाटील यांनी सात अधिकार्यांची चौकशी समिती नियुक्त केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. 
दंडात्मक कारवाईच्या भीतीपोटी मास्कचा वापर फक्त कानाला अडकविण्यापुरता सुरू आहे. त्याचबरोबर कारवाईची भीती नसल्याने कसल्याही प्रकारचे शारीरिक अंतर न पाळता ठिकठिकाणी गर्दी पाहावयास मिळत आहे. 

१९५७ पैकी १६२२ उपचारानंतर बरे- दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत १९५७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे व त्यापैकी उपचारानंतर १६२२ जण बरे झाले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातील ३५ व शहरातील १८, असे एकूण ५२३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण २८२ बाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॅा. राजेश पाखरे यांनी दिली.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT