corona pune sakal
पुणे

पुणे : कोरोनाने मृत्यू ८८ कर्चाऱ्यांचा अन मदत मिळाली फक्त १५ जणांनाच

महापालिकेच्या मुख्यसभेने गेल्या महिन्यात प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : ‘‘माझ्या वडिलांचा गेल्यावर्षी कोरोनाने(corona) मृत्यू झाला, महापालिकेत(pune carporation) अनुकंपावर नोकरी मिळाली. पण आर्थिक मदत मिळाली नाही. आता नव्या निर्णयानुसार ५० लाख रुपये दिले जाणार आहेत, पण माझ्या सारखे अनेक जण एकावर्षापेक्षा जास्त कालावधीपासून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक जणांना तर अनुकंपाची नोकरी आणि आर्थिक मदतही (economical help)नाही मिळालेली. आपल्याच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांबद्दल प्रशासन उदासीन का आहे? असा प्रश्‍न मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय(workers family) विचारत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महापालिकेतील ८८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, पण आत्तापर्यंत फक्त १५ जणांच्याच कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेने गेल्या महिन्यात प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला, पण याची फाइल प्रशासकीय मान्यतेच्या फेरीतच अडकून आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मात्र मदती कधी मिळणार याच्या चौकशीसाठी खेटे मारून महापालिकेत हैरान झाले आहे.

कोरोनाच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुणेकरांची सेवा करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. या काळात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. केंद्र सरकार आणि महापालिकेच्या मदतीने १ कोटी रुपये या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळतील अशी घोषणा करण्यात आली होती. पण केंद्र सरकारने केवळ कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मदत देण्याचा निकष लावला. तर महापालिकेने ५० लाख रुपये किंवा अनुकंपावर नोकरी असे धोरण तयार केले होते.पुणे

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८८ कर्मचाऱ्यांचे कोरोना निधन झाले, त्यापैकी २५ जणांच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपावर नोकरी दिली. त्यापैकी १५ जणांना २५ लाखाची मदत मिळाली. तर १० कुटुंबीय अजूनही प्रतिक्षेत आहेत. तसेच ६३ जणांच्या कुटुंबीयांना ना नोकरी मिळाली ना आर्थिक मदत अशी अवस्था आहे. मुख्यसभेत निर्णय झाल्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी कामगार कल्याण विभागाकडून अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडे प्रस्ताव गेला. तेथे काही दिवस गेल्यानंतर आता हा प्रस्ताव आयुक्त विक्रम कुमार यांच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

राज्य सरकारच्या आदेशामुळे फायदा

राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी आदेश काढून कोरोनात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखाची मदत करा असे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या मुख्यसभेत देखील प्रत्येकी ५० लाख देण्याचा निर्णय घेतला. ज्यांना यापूर्वी २५ लाख रुपये मिळाले आहेत त्यांना उर्वरित २५ लाखाची रक्कम मिळणार आहे. तर इतरांना ५० लाख रुपये दिले जाणार आहेत.

‘‘मुख्यसभेत झालेल्या निर्णयानुसार ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.’’

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

अशी आहे सद्यःस्थिती

  1. कोरोनामुळे मृत कर्मचारी - ८८

  2. अनुकंपावर नोकरी मिळालेले कुटुंबीय - २५

  3. नोकरीसह आर्थिक मदत मिळालेले कुटुंबीय - १५

  4. नोकरी व आर्थिक मदत न मिळालेले कुटुंबीय - ६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT