Healthy Lifestyle sakal
पुणे

कोरोना काळात आरोग्यदायी जीवनशैली गरजेची!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतरपालन, या त्रिसूत्रीचा अवलंब नागरिक करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतरपालन, या त्रिसूत्रीचा अवलंब नागरिक करत आहेत.

पुणे - कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतरपालन, या त्रिसूत्रीचा अवलंब नागरिक करत आहेत. मात्र ही खबरदारी घेऊनही कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी सक्षम प्रतिकारशक्ती (Immunity Power) गरजेची आहे. ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फिटनेसला (Fitness) पर्याय नाही. प्रत्येकाने नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचा अवलंब करत निरोगी जीवनशैलीची वाट चोखाळावी. त्यामुळे कोरोनासह इतरही आजारांचा सामना करण्यासाठी मदत होईल, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर संसर्गाची तीव्रता तुलनेने कमी असते. तसेच ती व्यक्ती अधिक लवकर बरी होऊ शकते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वयानुसार आणि प्रकृतीनुसार नियमित व्यायाम करावा. यामध्ये चालणे, धावणे आणि पोहणे या व्यायाम प्रकारांचा प्रामुख्याने समावेश असावा. यांमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते. तसेच वयानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्यांना शक्य असेल त्यांनी वजन उचलण्याचे व्यायामही आठवड्यातून तीन ते चार वेळा करावे. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते. याशिवाय प्राणायाम आणि योगासनांचाही व्यायामात समावेश करण्यास हरकत नाही. तसेच कोरोना काळात अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ लागू झाल्याने दीर्घकाळ बैठे काम करावे लागत आहे. अशा व्यक्तींनी काम करतांना ताठ बसणे, दर तासाने जागेवरून उठून पाय मोकळे करणे, स्र्टेचिंग करणे आदी गोष्टी कराव्यात. तसेच बसल्या जागी प्राणायाम देखील करता येतील, असा सल्ला ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. नितीन माने यांनी दिला.

व्यायामाच्या जोडीला संतुलित आहारही प्रतिकारशक्ती वाढवण्यात मोलाची भूमिका बजावतो. त्यामुळेच आहारावरही काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. या काळात कमीत कमी प्रक्रिया केलेल्या अन्नाचे आणि घरी तयार करण्यात आलेल्या अन्नाचे सेवन करावे. ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश असावा. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ आहारात असावेत. मात्र व्हिटॅमिनच्या गोळ्या घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच फळांचा रस पिणे शक्यतो टाळावे. आहारात तेल, तूप यांचे प्रमाण कमी असावे. यासह डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, असे आहारतज्ज्ञ डॉ. राधिका शहा यांनी सांगितले.

यांचा करा आहारात समावेश -

- ताज्या भाज्या व फळे

- विविध भाज्यांचे सूप

- दूध, दही, ताक असे पदार्थ

- मोड आलेली कडधान्ये

- सॅलड

- लिंबू पाणी, आवळ्याचा रस

- मांसाहारींनी अंड्याचा पांढरा भाग, चिकन सूप

हे करा व्यायाम -

- चार ते पाच किलोमीटर चालणे अथवा धावणे

- शक्य असल्यास पोहण्याचा व्यायाम

- (डॉक्टरांच्या सल्ल्याने) हलकी वजने/डंबेल्स उचलणे

- प्राणायाम, योगासने

- हलके स्ट्रेचिंग

- सायकलिंग व दोरीवरच्या उड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT