corona  
पुणे

अबब...दौंडमधील एकाच कुटुंबात नऊ जणांना कोरोना

रमेश वत्रे

केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव येथील एकाच कुटुंबातील एका डॉक्टरसह नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे केडगाव येथे कोरोनाबाधितांची संख्या आता दहा झाली आहे.

केडगावात सर्वप्रथम कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांचे कुटुंब मोठे आहे. या एकाच कुटुंबातील नऊ जणांना गेल्या चार दिवसात कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण केडगावातील धुमळीचा मळा येथे राहतात. यात 96 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेचाही समावेश आहे. या कुटुंबातील कोरोना साखळी थांबत नसल्याने काळजी व्यक्त होत आहे.

तसेच, दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथे एका महिलेला आज कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बोरीपार्धीतील नऊ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बोरीपार्धीतील एकूण संख्या आता पाच झाली आहे. चौफुला येथील एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

या दोन्ही गावातील कोरोना सर्वे पूर्ण होत आला आहे. जुने आजार असलेल्या ज्येष्ठ रुग्णांची वेगळी यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असले, तरी त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोना रुग्ण सापडू लागल्याने केडगाव व बोरीपार्धी येथील बाजारपेठेत गेल्या चार दिवसांपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

आमदार राहुल कुल यांनी पाटस, केडगाव, बोरिपार्धी या गावातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाटस व केडगाव येथील डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा कसून शोध घ्यावा, अशी सूचना दिली आहे. या बैठकीला तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, मंडल अधिकारी, ग्रामसेवक सरपंच उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT