coconut.jpg 
पुणे

लाॅकडाउनमुळे नारळाच्या उलाढालीचं झालं खोबर

प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल, मे महिन्यात यात्रा, सण, लग्नसराई, हॉटेल्स, विविध समारंभ कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यंदा नारळाच्या उलाढालीत ५० ते ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. परंतु, आषाढी एकादशीनंतर आखाडासाठी नारळाला मागणी वाढणार असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी वर्तविला आहे. मागील तीन महिन्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या नारळाच्या शेकडा दरात ५०० रूपयांनी घट झाली आहे.

गुळ-भुसार बाजारात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा आधी दररोज सुमारे दीड ते दोन लाख नारळाची आवक होत असते. तसेच दररोज साधारण दीड ते दोन लाख नारळाची शहर आणि उपनगरातून मागणी असते. तर सण, समारंभाच्या काळात हीच मागणी अडीच ते तीन लाखांवर जाते. कोरोनामुळे सध्या नारळाची पन्नास टक्क्यांनी आवक घटली आहे. तसेच केवळ वीस टक्केच मागणी असल्याचे बोरा यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतून मार्केट यार्डात नारळाची आवक होते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पूजा व तोरणासाठी नव्या नारळाला मागणी असते. तर, हॉटेल व्यावसायिकांकडून मद्रास आणि सापसोल नारळाला मोठी मागणी असते. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत सर्व प्रकारच्या नारळाच्या शेकडा दरात ५०० रूपयांनी घट झाली आहे. आता व्यापाऱ्यांना आखाड महिन्यात नारळाला मागणी वाढून उलाढाल वाढण्याची अपेक्षा आहे.

नारळाचा शेकडा दर
नवा नारळ- १३५० ते १४५०
सापसोल- १६०० ते २५००
पालको-  १४५० ते १५००
मद्रास- २३०० ते २६००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT