Self-Help-Group 
पुणे

कोरोना संपला, आता सकाळ अंक वितरण वाढवा : बचतगट महिलांची जोरदार मागणी

सकाळवृत्तसेवा

शिक्रापूर - कोरोना आता संपलाय, आम्हाला आता दररोज सकाळ अंकाचे वितरण सुरळीत करुन द्या. आम्ही सर्व एकुण दहा बचतगटातील महिला मैत्रिण स्पर्धेत सहभागी होत असून सकाळशिवाय अन्य वृत्तपत्रे आम्हाला टाकली जावू नयेत याबाबत वितरकांना सुचना करा अशा थेट सुचना करीत शिक्रापूरातील दहा बचतगटातील महिलांनी आज सकाळ मैत्रिण स्पर्धेचा जंगी शुभारंभ केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खास महिला वाचकांसाठी मैत्रिण सदरावर आधारित स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ येथील जातेगाव रोड परिसरात जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा धुमाळ पुढाकाराने संपन्न झाला. एकुण दहा महिला बचत गटाच्या प्रतिनिधी महिलांनी या कार्यक्रमात आपला स्पर्धा सहभाग जाहिर करतानाच कोरोनामुळे सकाळ अंकाचे वितरण विस्कळीत झाल्याचे सांगत सकाळ आता पुन्हा सुरळीत करण्याचे जाहिर आवाहन वितरण अधिकारी गणेश चव्हाण यांचेपुढे केले. दरम्यान स्थानिक वितरण एजंट संतोष शेंडे यांनीही यावेळी महिलांना सकारात्मक प्रतिसाद देत घरपोच अंक देण्याचे तसेच हवा त्यांना स्टॉल तसेच शेंडे यांच्या निवासस्थानीही अंक देण्याची ग्वाही दिली. 

दरम्यान यावेळी ज्ञानाई महिला गटाच्या अध्यक्षा मनिषा धुमाळ यांची अखिल विश्व वारकरी परिषदेच्या शिरुर व हवेली तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थितांचे वतीने चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला. उपस्थित महिलांनी यावेळी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आपले व्यवसाय-उद्योग कसे चालविले याचे अनुभवही यावेळी उपस्थितांना सांगितले. बचत गटाचय उपाध्यक्षा विमल सासवडे, पुष्पा शिंदे, आशा गवारे, अलका कळमकर, ज्योती महाजन, अमृता राऊत, वंदना कळमकर, सुनिता महाजन, मनिषा खेडेकर, निर्मला भुजबळ, उषा कळमकर, भारती त्र्यंबके, संगीता जाधव, नंदाताई भुजबळ आदींनेने आपापल्या भावना व्यक्त केल्या व कोरोनाकाळात जी आर्थिक कुचंबना झाली त्यासाठी आता सर्वांनी खुलेपणाने व्यवसाय-उद्योगात झोकुन देवून काम करावे व सकाळच्या मैत्रिण स्पर्धेत सहभाग घेऊन सकाळच्या विधायक भूमिकेला पाठींबा व्यक्त करावा अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा धुमाळ यांनी केले तर आभार भारती त्र्यंबके यांनी मानले. 

'आज तुझी विकेट टाकतो' म्हणत टोळक्याचा तरूणावर प्राणघातक हल्ला 

आम्हाला सकाळच हवा असतो पण...!
काही वेळा सकाळच्या नावाने इतर वृत्तपत्रांचे अंक वाटले जात असल्याची तक्रार यावेळी महिलांनी केली. आम्हाला सकाळच हवा असतो. याबाबत सकाळ वितरण विभागाने आमच्या मागणीचा गांभिर्याने विचार करावा असे यावेळी महिलांनी सांगितले तर आम्ही दर महिन्याचे अंकबील आगावू देवू अशीही ग्वाही यावेळी महिलांनी केली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT