corona1 
पुणे

घरमालकाला कोरोना झाल्यामुळे तरुणी आली गावाला...ताप आल्यामुळे तपासणी केली तर...

संतोष काळे

राहू (पुणे) : दौंड तालुक्यातील पानवली येथील एका तरुणीचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.

पानवली येथील २४ वर्षाची तरुणी पुणे येथे कामानिमित्त होती. तिच्या रूम मालकाला व मालकिनीला कोरोनाची बाधा झाल्याने ती दोन दिवसांपूर्वी आपल्या वडिलांकडे पानवली येथे आली होती. त्यावेळी तिला ताप व खोकला येत असल्याने राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली. तेथे तिची कोरोना विषाणूची तपासणी करण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन पांढरे यांनी दिला. तिची कोरोना विषाणूची वैद्यकीय तपासणी खासगी लॅबमध्ये करण्यात आली असून, तिचा वैद्यकीय अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जाऊन, कोरोना नियंत्रण समिती व ग्रामस्थांशी चर्चा केली. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे त्यांच्या घशातील द्राव काढून प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तसेच, तरुणीला कोरोनाचा संसर्ग नेमका कोठे आणि झाला. याचा तपास आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.  

दरम्यान  ग्रामस्थांनी घाबरून न जाता लॉकडाउनचे नियम पाळून घरात बसूनच स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पानवली गावांमध्ये चौदा दिवस जनता कर्फ्यू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या तरुणीचे आई, वडील, भाऊ यांच्या घशातील द्राव्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे डॉ. रासगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT