Sourabh_Rao 
पुणे

पुण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक; विभागीय आयुक्तांनी व्यक्त केले मत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना चाचण्यांमध्ये पुणे देशात आघाडीवर असून, या चाचण्या वाढविल्यामुळे कोरोनाचे निदान वेळेत होऊन रुग्णाला वेळेत उपचार मिळतात. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये भारतीय जैन संघटना आणि पुणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ॲन्टीजेन चाचणी केंद्राची पाहणी विभागीय आयुक्त राव यांनी केली. तसेच लॉकडाऊन कालावधी दरम्यान केलेल्या कार्याच्या अहवाल पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक अविनाश साळवे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, साहिल देव आदी या वेळी उपस्थित होते.  

राव म्हणाले, नैसर्गिक संकटात सामाजिक संस्थांच्या मदतीची आवश्यकता असते. भारतीय जैन संघटनेसारख्या अनेक सामाजिक संस्था कोरोना संसर्ग उपाययोजनांच्या कामात कार्यरत आहेत, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. यामुळे नागरिकांची आरोग्य तपासणी गतीने होण्यास मदत झाली. कोरोनाचे वेळीच निदान झाल्याने मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली.

पुणे महापालिका क्षेत्रात देशात सर्वाधिक कोरोना निदानाच्या चाचण्या होत आहेत. सलग ५२ दिवसांपासून पुणे कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांमध्ये आघाडीवर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानकारक बाब आहे. कोरोनातून बरे झालेल्या आणि प्लाझ्मा दान पात्रतेचे निकष पूर्ण करत असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महापौर मोहोळ म्हणाले, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात सामाजिक संस्थांनी मदतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. कोरोना निदानासाठीच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. निदान आणि उपचार वेळेत होतील, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लवकरच पुणे शहर कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT