corona patient sakal
पुणे

पुणे : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २६५ नवे कोरोना रुग्ण

एकूण नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने शनिवारी (ता.२५) सलग दुसऱ्या दिवशी अडीचशेचा आकडा पार केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune District) दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येने शनिवारी (ता.२५) सलग दुसऱ्या दिवशी अडीचशेचा आकडा पार केला आहे. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २६५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय दिवसांतील नवीन रुग्णांच्या संख्येत आणि जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा दोन हजारांच्या घरात पोचली आहे. यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. पण खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

याउलट दिवसभरातील एकूण नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची कमी होऊ लागली आहे. शनिवारी २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही नवीन रुग्णांच्या तुलनेत लक्षणीय कमी होत असल्याचे दिसू लागले आहे. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही १ हजार ९७८ इतकी आहे. दोन आठवड्यांपूर्वी हीच संख्या एक हजार सहाशेपर्यंत खाली आली होती.

दिवसातील जिल्ह्यातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १४९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात अन्य दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये ६३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३३, नगरपालिका हद्दीत ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ५६० जण उपचार घेत असून उर्वरित १ हजार ४१८ गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT