corona  
पुणे

मंचर ग्रामस्थांना शाॅक, कोरोनाबाधित 52 जणांच्या संपर्कात 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे गुरुवारी (ता. २५) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला ६५ वर्षाचा एक रुग्ण मिळाला आहे. संबंधित व्यक्ती प्रतिष्टीत असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. ते तब्बल ५२ जणांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  

मंचर येथे २५ दिवसांपूर्वी मुंबईहून आलेली गर्भवती पॉझिटिव्ह आढळून आली होती. प्रसूतीनंतर तिच्या बाळाची चाचणी निगेटिव्ह आली होती. मंचर ग्रामपंचायतीतील महिला कर्मचाऱ्यांनी दोन दिवस बाळाचा सांभाळ केला होता. सदर महिला बरी झाल्यामुळे तिला घरी सोडले आहे. त्यामुळे मंचरकरानी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण, गुरुवारी दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मंचरकर चिंतेत पडले आहेत.
 त्यांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

कोरोनाबाधित व्यक्ती महावितरण कंपनीच्या कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. दहा दिवसांपूर्वी ते पुण्याला कामानिमित्त गेले होते. त्यांचा महावितरण कंपनीतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क आल्याचा संशय आहे. त्यांचा मुलगा व मुलगी काम करत असलेल्या ठिकाणीही त्यांचा वावर होता. आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु केले आहे. त्यांना होम कवारंटाइन करण्यात आले आहे. 

मंचर शहराच्या दीड किलोमीटर अंतरावर या व्यक्तीचे वास्तव्य आहे. आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, सरपंच दत्ता गांजाळे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी कोरोनाबाधित राहत असलेल्या परिसराला भेट देऊन पाहणी केली.
खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना सुरु केल्या आहे. जनजागृतीचे अभियानही राबविले जात आहे.

आंबेगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 51 झाली आहे. त्यापैकी 42 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, सात जणांवर उपचार सुरू आहेत. नारोडी व चिंचोली येथील प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT