Vaccination Sakal
पुणे

दोन्ही डोसनंतरही कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ०.२५ टक्के

पुण्याने कोरोनाची पहिली आणि दुसऱ्या लाटेचा भयंकर अनुभव घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत. आता कसलीही काळजी नाही, असा विचार करीत असाल, तर तसे करू नका. पुणे जिल्ह्यात दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ०.२५ टक्के इतके आहे. या उलट एक डोस झाल्यानंतर बाधित होणाऱ्यांचे प्रमाण हे यापेक्षा कमी आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार स्वच्छ हात धुणे या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करा, तरच तुम्ही स्वतः आणि तुमच्या स्वतःच्या संपर्कात येणाऱ्यांना सुरक्षित ठेवू शकाल.

पुण्याने कोरोनाची पहिली आणि दुसऱ्या लाटेचा भयंकर अनुभव घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. ती टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या आपल्यापुढे आहे. कोरोना बाधितांचा आकडा कमी झाल्याने सर्व जनजीवन पूर्ववत होत आहे. त्याच दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत. त्यात शाळा आणि महाविद्यालया देखील सुरू होत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या उपयोजनांचा आग्रह धरला जात आहे.

तर लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. याला लोकांकडून प्रतिसाद मिळत असून लसीकरणाची संख्या गेल्या दोन महिन्यांत वेगाने वाढली आहे. परंतु लसीकरणाचे दोन डोस झाल्यानंतर नागरीकांनामध्ये बेफिकिरी वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे हे सहज आढळून येत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची वाढण्याचा धोका कायम असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास उपचारासाठी रुग्णालयांची संख्या कमी आहे. तसेच त्यांच्यापासून इतरांना धोका मात्र कायम असतो. कारण त्यांच्या माध्यमातून संपर्क येणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्यांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात स्वच्छ धुण्याच्या त्रिसूत्रीचा गांभीर्याने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT