कोरोना व्हायरस ई सकाळ
पुणे

बारामतीत कोरोना हळुहळू नियंत्रणात

- मिलिंद संगई

बारामती : तालुक्यातील कोरोनाची (corona) परिस्थिती आता हळुहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. बारामतीतील(Baramati) रुग्णांच्या पॉझिटीव्हीटीचा (Positivity)दर 24 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बारामतीचा हाच दर काही दिवसांपर्यंत 40 टक्क्यांहून अधिक होता. दुसरीकडे लसीकरणातही बारामतीने आघाडी घेतली असून एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण बारामतीत पूर्ण झाले आहे. (corona Positive rate of patients in Baramati drops by 24 percent)

बारामतीत 5 एप्रिलपासून लॉकडाऊन आहे, त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. रुग्णसंख्या आता हळुहळू कमी होऊ लागली आहे. तीनशेहून अधिक रुग्णसंख्या हा बारामतीचा गेल्या काही दिवसांचा नित्यक्रमच होऊन बसला होता. रुग्णसंख्येचा आकडा आता अडीचशेच्या घरात आला आहे. जो पर्यंत दहा टक्क्यांहून रुग्णसंख्येचा दर खाली येत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने बारामतीत परिस्थिती आटोक्यात आहे असे म्हणता येणार नाही, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नमूद केले.

बारामतीत नियमित होणारे मृत्यू ही बाब चिंतेची असून मृत्यूदर घटविण्यासाठी आता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची गरज लोक बोलून दाखवित आहेत. व्हेंटीलेटरवरील रुग्णांवर अधिक लक्ष पुरविण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान तिसरी लाट आली तर पुरेशी तयारी असावी या उद्देशाने बारामतीत प्रशासन सध्या अँक्शन मोड मध्ये आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैदयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे व महेश ढवाण यांची टीम दररोज आढावा घेत आहे.

लहान मुले कोरोनाने बाधित झाली तर कशी तयारी करायला हवी या दृष्टीने सध्या बालरोगतज्ज्ञांसमवेत प्रशासनाच्या दैनंदिन बैठका सुरु आहेत. अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन व विलगीकरण कक्षासह इतरही अडचणी उदभवू नये या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती दादासाहेब कांबळे यांनी दिली.

लसीकरणाने लाखांचा टप्पा ओलांडला...

बारामतीतील लसीकरणाच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. बारामतीत कालपासून लसीकरण केंद्रांची संख्या दोनवरुन चारवर गेली आहे. तालुक्यातही तीस लसीकरण केंद्र सुरु आहेत. लस उपलब्ध नसल्याने अनेकांना लवकर लस मिळत नसली तरी आता 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसरा डोस देण्यास प्रारंभ केल्याने लसीकरण केंद्रावरील गर्दीही ओसरली आहे.

बारामती दृष्टीक्षेपात.......

  • बारामतीत काल केलेल्या तपासण्या- 1062

  • बारामतीत काल पॉझिटीव्ह असलेले रुग्ण- 250

  • शहरी रुग्ण 104 ग्रामीण रुग्ण 146

  • आजअखेरची एकूण रुग्ण संख्या 21449

  • आजअखेर बरे झालेले रुग्ण- 17305

  • आजअखेर झालेले मृत्यू- 512

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

SCROLL FOR NEXT