corona 
पुणे

आंबेगावकरांची झोप उडणार, पंधरा जणांना कोरोना

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील पंधरा जणांचा कोरोना प्रादुर्भाव तपासणीचा अहवाल शुक्रवारी (ता. 29) पाँझिटिव्ह आला आहे. त्यात पेठ येथे दोन, शिनोली, घोडेगाव, एकलहरे येथील प्रत्येकी एक, वडगाव काशिंबेग येथील सात, फदालेवाडी येथील तीन जणांचा समावेश आहे. या पूर्वी दहा जण पाँझिटिव्ह सापडले आहेत. तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्याची संख्या आता 25 झाली आहे. पाँझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 104 गावातील गावकऱ्यांची व प्रशासनाची अक्षरशा झोप उडाली आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आज आलेल्या पाँझिटिव्ह अहवालात 13 जण मुंबईकर आहेत. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा पाँझिटिव्ह अहवाल आलेल्या सर्व रुग्णांचे नमुने मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच घेण्यात आले होते. या सर्व रुग्णांवर वडगाव काशिंबेग येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात दहा जणांचा अहवाल पाँझिटिव्ह आला होता. त्यापैकी शिनोली येथील रुग्ण बरा होवून गुरुवारी (ता. 28) घरी आला आहे. उर्वरित नऊ जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

या दहा जणांबरोबर गावी आलेल्या काही जणांचे नमुने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील यांनी घेतले होते. आज चौदा जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहे. त्यामध्ये पेठ, घोडेगाव, एकलहरे येथे प्रथमच कोरोनो विषाणूचा प्रदुभाव झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. घोडेगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे न्यायालय, तहसीलदार कार्यालय, तालुका पंचायत समिती आदी 15 शासकीय कार्यलय आहेत. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजप मंदिर लुटारूंसोबत की रामरक्षकांसोबत? नागपूरमध्ये उद्धव ठाकरे गरजले...

Rajapur Waterfalls : पावसाळा सुरू होताच राजापुरातील धबधबे ओसंडले; 'या' 5 धबधब्यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली पोस्ट; नेमकं काय म्हटलं?

ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

Pune News : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

SCROLL FOR NEXT