corona 
पुणे

दौंडमधील 235 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट... 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील २३६ नागरिकांचे घशातील स्त्राव कोरोना तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पाठविण्यात आले होते. त्यापैकी तब्बल २३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, तालुक्यातील एका तरूणाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून शहरातील १६० व राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) २ पोलिस, असे एकूण १६२ नागरिकांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार दौंड शहरातील सर्व १६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, एसआरपीएफमधील दोन पोलिसांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर
                   
तालुक्याच्या ग्रामीण भागातून १० ऑगस्ट रोजी ७६ नागरिकांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर खडकी (ता. दौंड) येथील एका ३३ वर्षीय तरूणास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
                
दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते १० ऑगस्ट २०२० या कालावधीत एकूण ६४४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी उपचारानंतर ४९२ जण बरे झाले आहेत. शहरातील १५ व ग्रामीण भागातील ९, असे एकूण २४ नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सक्रिय बाधितांची संख्या १२८ इतकी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT