plasma-therapy 
पुणे

खेड तालुक्यावरील विघ्नच टळले, 73 जणांचा अहवाल निगेटिव्ह

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यासाठी दिलासादायक बातमी असून, कोरोनाबाधितांच्या संपर्कांत आलेल्या ७३ जणांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. खेड तालुक्यातील यापूर्वीचे ५ रुग्ण कोरोना रुग्ण आजारातून बरे झाले असल्याने तालुक्यात आता १९ कोरोनाबाधित उरले आहेत.  

खेड तालुक्यात मुंबईहून वेताळे, वाशेरे, बुरसेवाडी  आणि वाजवणे या गावांमध्ये आलेला प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह आढळला होता. या आणि यापूर्वीच्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील तब्ब्ल ७५  जणांच्या घशातील द्राव तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांपैकी ७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे सर्वजण महाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल होते. त्यांना आता तेथून डिस्चार्ज देण्यात येणार असून, त्यांच्या त्यांच्या घरांमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे.

वासुली गावाजवळील एका कंपनीत कामाला येणारा, पण भोसरीत राहणारा एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे त्या कंपनीचा तो विभाग बंद ठेवण्यात आला आहे. त्याच्या निकटच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.  

खेड तालुक्यात राक्षेवाडी येथे १५ मे रोजी पहिला कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्या निकटच्या संपर्कातील चार जणांना त्याच्याकडून संसर्ग झाला होता. हे सर्वजण आता बरे झाले आहेत. राक्षेवाडीतील रुग्णानंतर चाकण (झित्राईमळा), वडगाव पाटोळे, कुरकुंडी, कडूस, पाईट, पापळवाडी, बुरसेवाडी, वेताळे, वाजवणे, वाशेरे या गावांमध्ये १९ कोरोनाबाधित टप्याटप्याने २९ मेपर्यंत आढळत राहिले. या रुग्णांवर प्रामुख्याने पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. गाढवे यांनी सांगितले. खेड तालुका सतर्क झाल्याने या पुढे संसर्गामुळे फारसे रुग्ण वाढणार नाहीत, अशी प्रशासनाला आशा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

"शाळानंतर 18 सिनेमे केले पण रिलीज झाले नाहीत" अंशुमनने व्यक्त केली खंत; म्हणाला..

कोस्टल कॉरिडॉरमुळे नकाशा बदलणार! अटल सेतू आता अलिबागकडे वळणार; नवा मार्ग कसा असणार?

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

SCROLL FOR NEXT