corona1 
पुणे

दौंडमधील 104 जणांच्या कोरोना तपासणीत 92 जणांचा रिपोर्ट... 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील १०४ कोरोना संशयित नागरिकांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविण्यात आले व त्यापैकी तब्बल ९२ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला आहे. बाधितांमध्ये शहरातील एका ज्येष्ठ व्यापारी यांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 
                  
दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ५९ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते, त्यापैकी दौंड शहरातील ६० व ६७ वर्षीय दोन ज्येष्ठ नागरिक व श्रीगोंदा (जि. नगर) येथील एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक यांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. तसेच, तालुक्याच्या ग्रामीण भागातून ४५ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी वासुंदे येथे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील दोन महिला व तीन पुरूष यांना बाधा झाली आहे. त्याचबरोबर कुरकुंभ येथे २ आणि खुटबाव व पारगाव प्रत्येकी एक, असे एकूण नऊ जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली.  बाधितांचे वय २० ते ७५ दरम्यान आहे.

दौंड तालुक्यात ५८२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर ३७३ जण बरे झाले आहेत. सध्या शहरातील १२५, ग्रामीण भागातील ६६ व राज्य राखीव पोलिस दलाचे १ पोलिस, अशा एकूण १९२ बाधितांवर दौंड, यवत, स्वामी चिंचोली येथील कोविड केअर सेंटर आणि विविध खासगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर काही बाधितांचे त्यांच्या घरातच विलगीकरण करून उपचार केले जात आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार

Narendra Modi Man Ki Baat : लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या 'या' कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये केले कौतुक

Ketan Agarwal Murder Case: "लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं"; चौकशीतून सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

ED Raid Former DIG : माजी डीआयजीकडे ५३ कोटींची संपत्ती; मुंबई, कोलकाता, आसाममध्ये ईडीचे छापे, गरीब पाहुण्याच्या नावावर कोट्यावधींची रक्कम

SCROLL FOR NEXT