rohan bathe 
पुणे

पुणे जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या या युवा नेत्याला कोरोना

किरण भदे

नसरापूर (पुणे) : भोर पंचायत समितीमधील काँग्रेसचे सदस्य रोहन दिलीप बाठे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे काल (ता. 23) स्पष्ट झाले. त्यांना किरकोळ त्रास होत असताना शंका काढण्यासाठी त्यांनी नसरापूर येथील रुग्णालयात स्वॅब देऊन तपासणी केली. मात्र, अहवाल पाॅझिटव्ह आला असून, त्यांची प्रकृती उत्तम असून, ते नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

रोहन बाठे हे मार्च महिन्यातील लाॅकडाउनपासून त्यांच्या मतदार संघासह तालुक्यात सक्रीय आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने गरजूंना अन्नधान्य किट वाटप परप्रांतियांना गावी पाठवणे, शासनाने केलेल्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर घेणे, आदी कार्यक्रमात स्वतःची काळजी घेत ते सक्रीय होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत ते वीर पुर्ऩवसन आराखडा मंजुरीसाठी पुणे, मुंबई व तालुका पातळीवरील भोर येथे बैठकासाठी ते सहभागी होत होते. मागील आठवड्यात त्यांनी भोर येथे नव्याने झालेल्या कोविड सेंटरला देखिल भेट दिली होती. दरम्यान, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांना ताप येत होता. त्यांनी तापावरील औषधे घेतली होती. परंतु, ताप कमी होत नव्हता, सोमवारी त्यांना जास्त ताप जाणवला. त्यावर त्यांनी शंका काढण्यासाठी नसरापूर येथील खासगी रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी स्वँब दिले. त्याचा अहवाल काल आला. त्या ते कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे समजले.

याबाबत रोहन बाठे यांनी सांगितले की, सतत विविध कार्यक्रमानिमित्त समाजाच्या संपर्कात असल्याने मला कोरोनाचा संसर्ग नक्की कोठे झाला, या बद्दल काही सांगता येत नाही. मात्र, त्वरीत मी तपासणी करून रुग्णालयात दाखल झालो आहे. माझी तब्बेत उत्तम असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना याबाबत कल्पना दिली असून, काळजी घेण्याचे व काही त्रास होत असल्यास त्वरीत तपासणी करून रुग्णालयात दाखल होण्याचे अवाहन केले आहे.

रोहन बाठे यांना कोरोनाची झाल्यामुळे भोर तालुक्यात प्रथमच राजकीय क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला. सतत जनतेच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांनी त्यामुळे काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम शक्यतो टाळून फोनवरूनच कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जात असून, थेट भेट टाळली जात आहे. रोहन बाठे यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व तालुक्यातील नेत्यांनी देखिल काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT