corona  
पुणे

वेल्ह्यातील नागरिकांसाठी या बारा जणांचा अहवाल ठरला...

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील निगडे येथील अकरा व दामगुडा आसनी येथील एक, अशा एकूण बारा जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहीती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.

वेल्हे तालुक्यातील साखर येथील एका ६० वर्षीय महिलेस ७ जुन रोजी व निगडे मोसे येथील एका एकोणीस वर्षीय बाळंत महिलेस ८ जुन रोजी कोरोनाची लागण झाली होती. साखर येथील संबधित महिलेच्या संपर्कातील सात व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सातही व्यक्तींचे काल रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. निगडे येथील अकरा जणांचे आणि दामगुडा आसनी येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट आज निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे वेल्हेकरांना दिलासा मिळाला आहे. साखर व निगडे येथील दोन्ही बाधित महिलांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे केवळ दोनच महिला कोरोनाबाधितांवर पुणे येथील रुग्नालयात उपचार सुरु आहेत. 

वेल्हे तालुक्यात २६ मे रोजी कोरोनाचा शेवटचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर बारा दिवसानंतर साखर व निगडे येथे दोन महिलांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर प्रशासन पुन्हा संतर्क झाले व साखर व निगडे परिसरातील काही गावे सील करण्यात आलेली आहेत. या गावामध्ये नियमित औषध फवारणी सुरु असून, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वेल्हे तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३ झाली असून, त्यापैकी ३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर दोन बांधितांवर उपचार सुरु आहेत. वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे येथील रहिवाशी असलेल्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असून, या मृत व्यक्तीची नोंद पुणे शहरात झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

'सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत'; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT