पुणे

पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात; बाधितांचे घरातच विलगीकरण 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या परंतु बाधित असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरातच विलगीकरण करून ठेवण्याबाबत महापालिकेचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर नागरिकांना पोलिस आयुक्तालयात व्हर्च्युअल अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पालखी सोहळ्याबाबतचे निकष शुक्रवारी (ता. 5 )जाहीर करण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी वेब पत्रकार परिषद आयोजित केली होती. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम या वेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध बाबींची माहिती दिली. 

शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. उद्याने, जॉगिंग पार्क नागरिकांसाठी हळूहळू खुली होत आहेत. तसेच, तुळशीबाग परिसरही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 
शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त 

- महापालिकेकडून झोपडपट्टी परिसर, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष 
-ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले, कोरोनाचा धोका असलेल्या व्याधीग्रस्तांचा विचार 
-पावसामुळे सर्दी, तापाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या तपासणीवर भर देण्यात येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

व्हर्च्युअल अपॉइंटमेंटमध्ये संबंधित व्यक्तींना मोबाईलवरून आपल्या अडचणी मांडता येतील. या धर्तीवर लवकरच पोलिस ठाण्यातही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 
के. वेंकटेशम,पोलिस आयुक्त 

-लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गुन्ह्यांत वाढ 
-पोलिस आयुक्तालयात नागरिकांना व्हर्च्युअल अपॉइंटमेंट 
-दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत सुविधा 


इंटरनेट गंडल्याने 'वर्क फ्रॉम होम'मध्ये खोडा; नोकरदारांसोबत नागरिकही वैतागले!

पालखी सोहळ्यात किती नागरिकांचा समावेश असावा, तसेच काय निकष असतील याबाबत बैठकीत निर्णय झाला आहे. उद्यापर्यंत (शुक्रवारी) लेखी सूचना काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले. 

- आषाढी वारी पायी होणार नसल्याने नवे निकष 
- भाविकांच्या संख्या राहणार कमी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT