Asha Volunteers
Asha Volunteers Sakal
पुणे

कोरोना सर्वेक्षण, लसीकरणाला खीळ; ३ हजार आशा स्वयंसेविका बेमुदत संपावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यातील सुमारे तीन हजार आशा स्वयंसेविका (Asha Volunteers) आणि सव्वाशे गटप्रवर्तक विविध मागण्यांसाठी आजपासून (ता. १५) बेमुदत संपावर (Strike) गेले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील संस्थात्मक प्रसूती, बालकांचे लसीकरण या नियमित कामांबरोबरच संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना सर्वेक्षणाला खीळ बसणार आहे. (Corona Survey Vaccination Hampered 3 Thousand Asha Volunteers on Indefinite Strike)

महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. मागण्यांची पुर्तता होईपर्यंत संप चालूच ठेवला जाणार असल्याचे या संघटनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस श्रीमंत घोडके यांनी सांगितले.

राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात ६६ हजार आशा स्वयंसेविका आणि चार हजार गट प्रवर्तकांची मानधन तत्त्वांवर नियुक्ती केली आहे. या आशा स्वयंसेविका गाव पातळीवरील विविध प्रकारची ७२ कामे करत असतात. यात प्रामुख्याने गर्भवतींची नोंदणी, त्यांचे लसीकरण याबाबतच्या माहितीचे अचूक संकलन, अहवाल सादरीकरण, बालकांचे लसीकरण आदी प्रमुख कामांचा समावेश आहे. याशिवाय कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून त्यांच्याकडे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करणे, घरोघरी जाऊ संशयित कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण करणे ही अतिरिक्त कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत.

या सर्व कामांसाठी त्यांना दरमहा सरासरी प्रत्येकी केवळ अडीच हजार रुपये मानधन मिळत असते. कोरोना सुरु झाल्यापासून या सर्वे सेविकांना दररोज आठ तासांची ड्यूटी लावली आहे. यामुळे त्यांचे आधी मिळणारे अडीच हजार रुपयांचे मानधन मिळेना झाले आहे. महिनाभर पूर्णवेळ काम करूनही पाच हजार रुपयांच्या आसपास मानधन दिले जात असल्याचेही घोडके यांनी सांगितले.

आशा स्वयंसेविकांच्या प्रमुख मागण्या

- एप्रिल २०२० पासून प्रतिदिन पाचशे रुपये मानधन द्यावे.

- विविध कामांसाठी मोबाईलची सुविधा द्यावी.

- कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास, वारसांना सरकारी नोकरी मिळावी

- दरमहा मानधन हे किमान वेतनाएवढे करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT