Corona Test 
पुणे

उरुळी, कुंजीरवाडीतील 42 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल... 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्‍यातील उरुळी कांचन व कुंजीरवाडी येथे मागील चार दिवसांच्या कालावधीत आढळून आलेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 17 व 25, अशा एकूण 42 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे हवेलीकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

पुण्याहून एक पन्नास वर्षीय पाहुणा चार दिवसांपूर्वी उरुळी कांचन येथील नातेवाइकांकडे हवापालट करण्यासाठी आला होता. मात्र, त्याला सर्दी व खोकल्याची लक्षणे असल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ पुणे शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ते कोरोनाबाधित निघाले. त्यामुळे उरुळी कांचन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या पाहुण्याच्या संपर्कातील उरुळी कांचन येथील 17 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली. त्यामुळे उरुळी कांचनमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

दुसऱ्या एका घटनेत कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाचा हडपसर- सासवड रस्त्यावर चार दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे समजले. आरोग्य विभागाने संबंधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची कोरोना टेस्ट केली होती. यात अपघात झाल्यानंतर व संबंधित युवकास उपचारासाठी नेणारे लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तीन कर्मचारी, अपघातग्रस्त तरुणास रुग्णवाहिकेत बसवून देण्यासाठी पोलिसांना मदत करणारे वडकी येथील सहा युवक, अपघातग्रस्त तरुणावर दोन खासगी रुग्णालयात उपचार करणारे दहा डॉक्‍टर व संबंधित तरुणाचे नातेवाईक, अशा 25 जणांचा समावेश होता. त्यातील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबूब लकडे यांनी दिली. त्यामुळे कुंजीरवाडी परिसरातील नागरिक आनंदी झाले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

उरुळी कांचनमधील व्यवहार सुरू करा 
उरुळी कांचनचे उपसरपंच जितेंद्र बडेकर म्हणाले, ""पुण्याहून उरुळी कांचन येथे आलेल्या कोरोनाबाधित पाहुण्याच्या संपर्कात आलेल्या सतरापैकी सतराही जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. सध्या उरुळी कांचन व परिसरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे उरुळी कांचन शहरातील व्यवहार सुरू करावेत, या मागणीसाठी गुरुवारी (ता. 14) ग्रामपंचायतीची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात उरुळी कांचन शहरातील सर्व व्यवहार सुरू व्हावेत, यासाठी ठराव करण्यात येणार आहे. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT