Corona tests of 8,000 citizens every day in Pune 
पुणे

काय सांगता? पुण्यात दररोज तब्बल आठ हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आता रोज आणखी दोन हजार चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज साडेसात ते आठ हजार नागरिकांच्या चाचण्या होणार आहेत. त्यासाठीच्या २० केंद्रांवर सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार यावेळेत सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यासाठी चाचणी बंधनकारक केली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

कोरोना रुग्णांना शोधून त्यांना वेळीच विलग करण्यासाठी महापालिकेने वेगाने पावले उचलली आहेत. त्यातून नव्याने चार चाचणी केंद्र वाढविल्यानंतर आता चाचण्यांचेही प्रमाण वाढविणार आहे. नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यासोबत (आरटीपीसीआर) ‘ऑटिजेन टेस्ट' करणार आहे. चाचण्यांचे अहवाल वेळेत येण्यासाठी संबंधित प्रयोगशाळांना सूचना केल्या आहेत. सध्या रोज सहा ते साडेसहा हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यातील निम्म्या चाचण्या खासगी प्रयोगशाळांत होत आहेत. उर्वरित महापालिकेच्या माध्यमातून केल्या जात आहेत.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या 

दरम्यान, शहरात कोरोनाविरोधातील उपायांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या इमारतीतही कोरोनाचे रुग्ण वाढले आहे. आरोग्य, घनकचरा व्यवस्थापनासह अन्य खात्यातील १२ जणांना कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. त्यात काही अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी सादर होणार अर्थसंकल्प, निर्मला सीतारामण मोरारजी देसाईंचा विक्रम मोडणार ?

Budget 2026 : आतापर्यंत 'या' अर्थमंत्र्यांनी सादर केले सर्वाधिक अर्थसंकल्प

Tirupati Laddu Ghee Test Report : तिरुपती लाडूतील तुपाच्या नमुन्यांत प्राणिसदृश चरबी? आंध्रच्या मंत्र्यांकडून अहवालाचा संदर्भ, भाविकांच्या भावनांशी खेळ

Union Budget 2026 : सुधारणाकेंद्री अर्थसंकल्प आज संसदेत; सीतारामन मांडणार आर्थिक नियोजनाची रूपरेषा

LPG Price Hike: अर्थसंकल्पाच्या दिवशीच महागाईचा स्फोट! गॅस सिलिंडर महाग, छोट्या उद्योगांना जबर धक्का

SCROLL FOR NEXT