jmbo hospital 
पुणे

पुणे : जम्बो रुग्णालय मजबूत

स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने (pune corporation) उभारलेले जम्बो रुग्णालय(jumbo hospital), तेथील शेड मजबूत आहे. पुढील सहा महिने त्याचा वापर करणे शक्य आहे. त्यामुळे कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेची तयारी करत असलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला आहे. (corona third wave pune jumbo hospital strong)

महापालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर जम्बो रुग्णालय उभारले आहे. तेथे ८०० खाटांची सुविधा असून ७०० ऑक्‍सिजनच्या खाटा आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना त्या काळात जम्बो रुग्णालय पुणेकरांसाठी वरदान ठरले. ऑगस्ट २०२० मध्ये जम्बो रुग्णालय सुरू झाले ते डिसेंबर महिन्यात बंद केले होते. त्यानंतर दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च २०२१ मध्ये पुन्हा वापर सुरू केला.

रुग्णसंख्या कमी झाल्याने ३० जूनपासून तेथील उपचार बंद केले आहेत. जम्बो रुग्णालयाचा शेड वर्षभर जुने असल्याने महापालिकेने त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दिल्ली आयआयटीकडून ऑडिट करून घेतले असून, त्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे. या रुग्णालयाच्या शेडला कोणताही धोका नाही, त्यामुळे १२ जानेवारी २०२२ पर्यंत त्याचा वापरता येईल, असे दिल्ली आयआयटीने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT