corona logo 
पुणे

मुंबईतून शिरूरला आलेल्या तीन जणांना कोरोना...अनेकांची घेतली भेट 

युनूस तांबोळी

टाकळी हाजी (पुणे) : जावयाने मुंबईतून आणून शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई येथील आरोग्य केंद्राजवळ सोडलेले आजीआजोबा व त्यांच्या दोन नाती, अशा चौघांपैकी तिघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. 

या आजीआजोबा व त्यांच्या दोन नातींना त्यांच्या साकोरे (ता. आंबेगाव) येथील जावयाने मुंबईतून कवठे येमाई येथे आणून शुक्रवारी (ता. 15) सोडले. या आजीआजोबांचे मूळगाव असले; तरी ते आरोग्य उपकेंद्रात तपासणी न करताच झोपले होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमनी यांनी तत्काळ आरोग्य केंद्र सॅनिटाइझ केले. त्यानंतर त्यांची तपासणी करून सांस्कृतिक भवनात त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. 

दरम्यान, या काळात संबंधित रुग्ण काही भागात फिरला. तसेच, गावातील काही जणांनी त्यांच्याकडे मुंबईचा हालहवाला देखील विचारला. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना गावात न फिरण्याची व दिलेल्या जागेत राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, संबधिताचा मुलगा मुंबईला कोरोना रुग्ण असून, मृत पावल्याची घटना समजली. त्यावेळी या चार जणांना पुणे (औंध) येथे तपासणीसाठी पाठविले. मंगळवारी (ता. 19) सकाळी चारपैकी तीन जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कट्टीमनी यांनी दिली. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कवठे येमाई गावाला भेट देऊन सूचना दिल्या आहेत. इतर प्रशासनाचे अजूनही कोणी फिरकले नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वयोवृद्ध आजीआजोबा अन्‌ दोन गोंडस नातींसाठी आरोग्य केंद्राजवळ ग्रामस्थ हळहळत होते. ग्रामस्थांनी भावनिक होऊन त्यांची जेवणाची व राहण्याची सोय केली होती. दोन दिवसांच्या काळात पॉझिटिव्ह असणाऱ्यांचा काही नागरिकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा १५ वर्षानंतर तोच जलवा! झळकावले ५८ वे शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा, सचिनचा विक्रम संकटात

Health Alert : सतत पिझ्झा-बर्गर खाणं आलं अंगलट!16 वर्षीय मुलीचा मृत्यूचं धक्कादायक सत्य उघड

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या १५५ धावा... १८ चौकार अन् ९ षटकार; मुंबईचा दणदणीत विजय

Swiggy Instamart Report : 'या' पठ्ठ्याने वर्षात कंडोमवर खर्च केलेत चक्क १ लाख रुपये! महिन्याला १९ ऑर्डर्स; व्हॅलेंटाईन डेला तर...

Latest Marathi News Live Update :गजन गौडा पाटील आणि आशिष सुरडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT