Corona Start swimming pool and playground orders of Ajit Pawar sakal
पुणे

जलतरण तलाव अन् खेळाची मैदाने सुरू करा; अजित पवार यांचे आदेश

पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश : कोरोनाचे दोन डोस अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर व जिल्ह्यातील खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाची मैदाने आणि खेळाडू व कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.२२) दिला आहे.(Corona Start swimming pool and playground orders of Ajit Pawar)

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, "खेळाडूंसाठी खेळाची मैदाने आणि जलतरण तलाव सुरू करणे गरजेचे आहे. जलतरण तलाव खेळाडुंबरोबरच कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठीही खुली केली पाहिजेत. त्यामुळे ती तातडीने सुरू करा. मात्र खेळाडूंनीसुद्वा कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असले पाहिजेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात. भीमाशंकर देवस्थानच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी. लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात यावा. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत १९ हजारांहून अधिक जन्म प्रमाणपत्रांमध्ये केलेले बदल रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय, कारण काय?

भारतीय संघात खळबळ! आम्हाला काय ते स्पष्ट सांगा... 'सीनियर्स' थेट BCCI कडे पोहोचले, गौतम गंभीरला खिजगणतीतही नाही धरले...

आरएसएस मुख्यालय, स्मृती भवन उडवून देऊ! धमकीच्या मेलनंतर नागपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, दोन तास केली तपासणी

Latest Marathi News Live Update : प्रशासनाच्या आश्वासनानंतर थकीत ऊस बिलासाठीचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Mumbai: रेल्वेला नवी लाइफलाइन! पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण, आधुनिक स्थानके सज्ज

SCROLL FOR NEXT