pune corona update new cases
pune corona update new cases 
पुणे

सिंहगड रोडवर रुग्ण वाढले; जाणून घ्या पुण्यात कोणत्या भागात किती रुग्ण?

सकाळ डिजिटल टीम

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झाल्यानं काही भागात रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर शहरामध्ये लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता आणि मास्कशिवाय फिरताना दिसत आहेत. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा मध्यवर्ती शहरातील पेठांमध्ये रुग्णांची संख्या जास्त होती. तर शहराबाहेर हेच प्रमाण कमी होतं. आता मात्र परिस्थिती याऊलट असून पेठांमधील रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसतं तर बाहेरच्या भागात रुग्ण वाढत आहेत.

पुणेकरांकडून असंच जर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत राहिले तर राज्य सरकारकडून नवीन लॉकडाऊन केलं जाऊ शकतं. कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या पुण्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र काही लोकांकडून उल्लंघन केलं जात असल्यानं पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन होणार की नाही हा सध्यातरी प्रश्नच आहे. पुण्यातील कोणत्या भागात जास्त रुग्णसंख्या आहे त्या भागात कंटेन्मेंट झोनची घोषणा होऊ शकते असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. 

कोणत्या भागात किती रुग्ण?

  • बिबवेवाडी - 42
  • सिंहगड रोड - 32
  • वारजे - 32 
  • नगर रोड - 28 
  • हडपसर - 27
  • येरवडा - 24
  • शिवाजीनगर - 23
  • औंध बाणेर - 22
  • कोथरुड - 19
  • कसबा पेठ - 15

नवीन रुग्णांमध्ये वाढ
पुण्यात मंगळवारी एकूण 309 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत पुण्यात कोरोनाचे 1 लाख 95 हजार 496 रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 272 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 88 हजार 975 वर पोहोचली आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी दिला लॉकडाऊनचा इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पण्याचे पालकमंत्री असून त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, राज्यात लोकांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन केलं जात असून हे निराशाजनक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर जिथं कोरोनाचे रुग्ण जास्त वाढत आहेत अशा ठिकाणी काही कडक निर्बंध लावायचे का यावर विचार केला जात आहे. लोकांनी मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सचं पालन करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT