Pune based startup Thincr Technologies made a unique mask  Sakal Media
पुणे

संपर्कात येताच कोरोनाचा नाश; पुण्यातील कंपनीचा भन्नाट मास्क!

भारतातील अशा पहिल्याच मास्कची सर्वत्र चर्चा

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एक दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने एक भन्नाट मास्क बनवला आहे. हा मास्क घातल्यानंतर कोरोना विषाणू तुमचं काहीही वाकडं करु शकणार नाही, असा दावा या कंपनीनं केला आहे. या विशेष मास्कच्या संपर्कात येताच खतरनाक कोरोना विषाणू निष्क्रीय होऊन जाईल. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी हा मास्क खूपच महत्वाचा ठरु शकतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे. विज्ञान आणि प्रोद्योगिक विभागाने (DST) सोमवारी ही माहिती दिली. (corona virus destroyed contact with mask made Pune based startup Thincr Technologies)

डीएसटीनं सांगितलं की, "पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीनं थ्रीडी-प्रिंटिंग आणि औषधांच्या मिश्रणातून एक असा मास्क तयार केला आहे. जो आपल्या संपर्कात येणाऱ्या व्हायरल पार्टिकल्स म्हणजेच विषाणूंना निष्क्रीय करुन टाकतो. थिंकर टेक्नॉलॉजिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या या कंपन्यांनी हा मास्क बनवला आहे. यावर विषाणूरोधक औषधाचा लेप लावलेला असतो"

कोणत्या पदार्थांचा करण्यात आला वापर?

डीएसटीनं सांगितलं की, "परीक्षणाद्वारे सांगण्यात आलं की, हा लेप सार्स कोव्ह-२ या विषाणूला अर्थात कोरोना विषाणूला निष्क्रिय करतो. या लेपमध्ये सोडियम ओलेफिन सल्फोनेटचं मिश्रण वापरण्यात आलं आहे. याचा वापर साबणामध्ये केला जातो. विषाणू या लेपच्या संपर्कात आल्यानंतर त्याचे बाहेरचे काटे नष्ट होऊन जातात. या लेपमधील सामग्री सामान्य तापमानाला स्थिर असते. त्याचा कॉस्मेटिक्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो"

यावर बोलताना थिंकर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक शीतलकुमार जामबाद म्हणाले, "आम्हाला हे जाणवलं की कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी हा मास्क स्वतःच एक मोठं हत्यार ठरु शकेल. सध्या वापरात येणारे मास्क हे घरगुती पद्धतीने बनवलेले कमी गुणवत्तेचे मास्क आहेत. त्यामुळे एक चांगला गुणवत्तेचा मास्क बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Gold Price : लग्नसराईत सोने १ लाख २५ हजार पार! मंगळवारी एकाच दिवसात सोन्यात २ हजार, चांदीत ४,५०० रुपयांची वाढ

अफगाणिस्तानमध्ये भारतीयांना मिळणार मोफत प्लॉट; तालिबान सरकारने का केली मोठी घोषणा?

'मला स्वप्न मराठीमध्ये पडतात' नाना पाटेकरांचा सचिन पिळगांवकरांना टोला, म्हणाले...

Laptop Care : भंगार होईल तुमचा लॅपटॉप! गडबडीत अर्धा देश करतोय 'या' 5 चुका; आत्ताच बदला सवयी नाहीतर पैसे जातील पाण्यात

Facebook Fraud Case : बुलाती है, मगर जाने का नहीं! फेसबुकवर 'ती'ची एक रिक्वेस्ट येते अन्...; मिरजेत नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT