Corona-Test 
पुणे

बारामतीचा आकडा पोहचला शतकाजवळ; चिंता वाढू लागली

मिलिंद संगई

बारामती - शहरात कोरोनाचा हळुहळू उद्रेक होऊ लागला आहे. दिवसागणिक कोरोनारुग्णांचा आकडा वाढू लागल्याने आता नागरिकांना जशी धास्ती वाटू लागली आहे, तशी प्रशासनापुढील चिंताही वाढू लागली आहे. 

आज बारामतीचा आकडा 91 पर्यंत जाऊन पोहोचला असून आता ही गती वाढेल की काय अशी भीती सर्वांना सतावू लागली आहे. दरम्यान बारामती नगरपालिकेच्या वतीने आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली. संशयित रुग्णांची तातडीने तपासणी केली जाणार असून पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी होणार आहे. दरम्यान प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी सर्वेक्षण करणा-या पथकाच्या मदतीसाठी कार्यकर्ते द्यावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी रात्री दहा नंतर व्यवसाय करणा-या पाच जणांवर कारवाई केली. रात्री दहा ते सकाळी पाच संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे. 

अहवाल येईपर्यंत रुग्णांना घरी सोडू नये...
ज्यांच्या स्वॅबची तपासणी सध्या केली जाते, त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर दुस-या दिवसापर्यंत त्यांचा अहवाल येत नाही. या मध्ये अनेक कोरोना पॉझिटीव्ह असलेले रुग्णही स्वॅब घेतल्यानंतर किमान 24 तास गावात फिरत राहतात, त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. स्वॅब घेतल्यानंतर जो पर्यंत रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह येत नाही अशा रुग्णांना घरी जाऊ देऊ नये, अशी मागणी नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी केली आहे. रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतरही प्रत्यक्ष दवाखान्यात दाखल होईपर्यंत संबंधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत असल्याने प्रसार वेगाने होत आहे, असे सातव म्हणाले.

स्वयंसेवकांना लस देणे गरजेचे असताना बहुसंख्य स्वयंसेवकांना लस दिली गेली नाही तर या पुढील काळात स्वयंसेवक घराबाहेर पडतानाही विचार करतील असा इशारा त्यांनी दिला. शिक्षक, पत्रकार, औषध दुकानातील कर्मचारी यांच्यासह ज्या व्यक्ती सुपरस्प्रेडर म्हणून गणल्या जातात त्यांची यादी करुन प्राधान्याने त्यांना लस दिली जावी अशीही त्यांनी मागणी केली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - घरंगळणारा रुपया

Nanded Election : देगलुर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ७१.३० % मतदान; शहरातील मतदान केंद्रावर सकाळपासून लांबच लांब रांगा!

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT