Pune Weekend Lockdown
Pune Weekend Lockdown Sakal
पुणे

पुण्यात लॉकडाउन नको; लसीकरणाचा वेग वाढवा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे १५ मे पासून पुन्हा लॉकडाउन नको, अशी मागणी व्यापार-उद्योग क्षेत्रांतून होऊ लागली आहे. एक महिना थांबलेले अर्थचक्र सुरळीत केव्हा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लसीकरणाचा वेग वाढवा, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन होईल, यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करून आरोग्य व्यवस्था सक्षम करावी, असे उद्योग- व्यापार क्षेत्राचे म्हणणे आहे.

शहरातील रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. मात्र, अन्य जिल्ह्यांत, राज्यांतील संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना लागू होणारे नियम पुण्याला लागू करा नका, अशी मागणी शहरातील उद्योग क्षेत्राने केली आहे. पुण्यात एप्रिलपासूनच लॉकडाउन सुरू झाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शहर, पिंपरी चिंचवड आणि परिसरात सध्या अत्यावश्यक सेवेशी आणि आयात-निर्यातीशी संबंधित उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अन्य उद्योग केव्हा सुरू होणार, त्यांच्या ऑर्डर्स केव्हा पूर्ण होणार, पीएमपी बंद असल्यामुळे कामगारांच्या वाहतुकीलाही अडचणी येत आहेत, त्यामुळे पुन्हा लॉकडाउन केल्यास उद्योग- व्यवसाय रसातळाला जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी लसीचे डोस उपलब्ध झालेले नाहीत. तसेच, हॉटेल व्यवसायही बंद पडले आहेत, याकडेही उद्योग क्षेत्राने लक्ष वेधले.

लॉकडाउनचा विचार राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर करणे योग्य होणार नाही. प्रत्येक शहरातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारचा टास्क फोर्स, आरोग्यतज्ज्ञ यांनी याबाबतचा निर्णय घेतला पाहिजे. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला पाहिजे. लॉकडाउन हा सरसकट पर्याय होऊ शकत नाही.

- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए

रुग्ण वाढत होते, तेव्हा शहरातील व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे एक महिन्यापासून व्यवसाय बंद आहेत. आता रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे. पुन्हा लॉकडाउन लागू करणे चुकीचे होईल. आकडेवारी तपासून अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे.

- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ

उद्योगांतून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यातूनच अर्थव्यवस्था सुरू राहते. अनेक उद्योग बंद असल्यामुळे उद्योजक आणि कामगार अडचणीत आले आहेत. त्या घटकांचाही विचार करणे गरजेचे आहे. सरसकट लॉकडाउन हा काही उपाय नाही. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.

- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT