corona  
पुणे

धक्कादायक, पुण्यातून पेरणीसाठी शिरूरला आलेल्या महिलेला कोरोना 

प्रताप भोईटे

न्हावरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरातील कोकडेवाडी येथे पेरणीच्या कामासाठी आठ दिवसांपूर्वी आलेल्या व मूळच्या कोंढवा (पुणे) येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.


कोकडेवाडी येथे कोंढवा येथून एक ५५ वर्षीय महिला शेतातील पेरणीच्या कामासाठी १२ जून रोजी आली होती. दरम्यानच्या काळात या महिलेने आपला मुक्काम कोकडेवाडी येथील नातलगांच्या घरी केला होता. ही महिला परत कोंढवा येथील आपल्या घरी गेल्यानंतर तिच्या कोंढवा येथे राहणाऱ्या पुतण्याचा कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधित महिलेची कोरोना तपासणी केली. त्यात तिचा अहवाल २० जून रोजी पाँझिटिव्ह आला आहे. याच महिलेच्या कोकडेवाडी येथील दोन नातलगांनी तिच्या कोंढवा येथील घरी एक दिवस मुक्काम केल्याने प्रशासनाची काहीशी काळजी वाढली आहे. 


संबधित महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे समजताच ग्रामप्रशासन व आरोग्य विभागाची यंत्रणा संतर्क झाली असून, या महिलेच्या कोकडेवाडी येथे संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. उद्या (ता. २३) आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या दहा व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सरपंच मंदा शेंडगे व ग्रामविकास अधिकारी पी. सी. केदारी यांनी सांगितले.

न्हावरे येथे वीस दिवसांपूर्वीच मुंबई (अंधेरी) येथून एक महिला व पुरुष येथे आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पंधरा दिवसाच्या उपचारानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला होता. मात्र, आता पुन्हा महिला पाॅझिटिव्ह निघाल्यामुळे ग्रामस्थामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT