पुणे

कोरोनामुळे होणारा न्यूमोनिया टाळणे शक्य; फुप्फुसरोगतज्ज्ञांचे मत

न्यूमोनिया दिन जगभर शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्ताने कोरोनामुळे होणाऱ्या न्यूमोनियाबद्दल जनजागृती करण्यासाठी फुप्फुसरोगतज्ज्ञांनी ही माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक लस हेच सध्या प्रभावी शस्त्र आहे. कोरोनाला प्रतिबंध केल्यास त्यापासून होणारा न्यूमोनियादेखील आपल्याला टाळणे शक्य असल्याचा विश्वास फुप्फुसरोगतज्ज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केला.

न्यूमोनिया दिन जगभर शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्ताने कोरोनामुळे होणाऱ्या न्यूमोनियाबद्दल जनजागृती करण्यासाठी फुप्फुसरोगतज्ज्ञांनी ही माहिती दिली. कोरोना हा आजार मूलतः फुप्फुस संबंधित आहे. त्यामुळे फुप्फुस हीच कोरोनाची युद्धभूमी आहे. कोरोनाचा विषाणू श्वसनमार्गातून किंवा तोंडाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर ते फुप्फुसात जातात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांना न्यूमोनिया होतो. हा न्यूमोनिया सामान्यतः होणाऱ्या न्यूमोनियापेक्षा वेगळा असतो.

न्यूमोनिया कशाला म्हणतात?

विषाणू, जिवाणू, बुरशी अशा सूक्ष्म रोगजंतूच्या प्रादुर्भावामुळे न्यूमोनिया होतो. फुप्फुसातील वायुकोष्ठिकामध्ये सूक्ष्म रोगजंतू प्रवेश करतात. त्यामुळे रक्ताद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याची, फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या रोगजंतूंशी निकराने लढा देते. यातून फुप्फुसात द्रव पदार्थ तयार होतो. त्यामुळे ऑक्सिजन शोषून कार्बन डाय-ऑक्साईड बाहेर फेकण्याची क्रिया मंदावते. रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. दम लागतो आणि खूप खोकला येतो. त्याला वैद्यकीय परिभाषेत न्यूमोनिया म्हणतात.

कोरोना आणि न्यूमोनिया

फक्त कोरोनामुळेच न्यूमोनिया होत नाही. तसेच, कोरोना झालेल्या प्रत्येकालाच तो होतो असेही नाही. त्यामुळे न्यूमोनिया नेमका कशामुळे झालाय याचे प्रयोगशाळेत अचूक निदान होते. गेल्या दीड वर्षांपासून आपल्याकडे कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे कोरोना हेच बहुतांश रुग्णांमधील न्यूमोनियाचे कारण ठरत आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर ते फुप्फुसाकडे सरकू लागतात. त्यावेळी रुग्णाला ताप येतो. खोकल्याची प्रचंड ढास लागते. दम लागतो. श्वास घ्यायला त्रास होतो. याच वेळी रुग्णावर प्रभावी उपचार केल्यास कोरोनाच्या न्यूमोनियापर्यंत रुग्ण पोचत नाही. तो लवकर बरा होतो. त्यासाठी लक्षणे दिसताच लवकर उपचार घेणे आवश्यक असते.

उपचार कसे करतात?

कोरोनामुळे झालेला न्यूमोनिया बरा करण्यासाठी रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणे, हे प्राधान्याने केले जाते. हा न्यूमोनिया इन्फ्लेमेटरी असल्याने स्टेरॉईड उपयुक्त ठरतात. त्यानंतर रुग्णाला झालेल्या संसर्गाच्या तीव्रतेप्रमाणे पुढील औषधांचा वापर केला जातो. तसेच, हाय फ्लो ऑक्सिजन, नॉन इनवेसिव्ह व्हेंटिलेटर आणि इनक्युबेशन असे उपचाराचे टप्पे आहेत. सर्वसाधारणतः नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरपर्यंत थांबलेले रुग्ण बरे होण्याची शक्यता असते. इनवेसिव्ह व्हेंटिलेटरमधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी आहे, असेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदले.

कोरोनाच्या न्यूमोनियाला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रतिबंधक लस. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि वारंवार हात स्वच्छ धुणे यातून कोरोनाला आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो.

- डॉ. नितीन अभ्यंकर, फुप्फुसरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT