bhor panchayat samiti 
पुणे

भोरमध्ये कोरोनाची तीनच दिवसांची विश्रांती..आज पुन्हा जोरदार एंट्री

सकाळवृत्तसेवा

पुणे : भोर तालुक्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज कोरोनाच्या आणखी दोन रुग्णांची वाढ झाली. तसेच, नसरापूर येथील एल अँड टी कंपनीच्या कार्यालयात पुणे येथtन येणारया एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. नसरापूर येथे त्या कर्मचाऱ्याचा संपर्क आल्याने प्रशासनाने नसरापूर गाव प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे.

भोर :भोर तालुक्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज कोरोनाच्या आणखी दोन रुग्णांची वाढ झाली.शनिवारी (ता. १८) चार रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील १९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी संगमनेर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर, हातवे येथील एकजण शिरवळ येथील कंपनात कामास जात होता. कंपनीमार्फत त्यांची तपासणी केल्यावर तोही कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे, अशी माहिती तालुका वैद्कीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी दिली. 

तालुक्यातील हायरिक्स कॉन्टँक्टमधील ५३ जणांचे स्वॅब मागील दोन दिवसांमध्ये तपासणीसाठी पाठविले असून, त्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. यामध्ये महावितरणचे कर्मचारी, उत्रौली व किकवी येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींच्या अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनाग्रस्त असलेल्या ८३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, ४६ कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुण्यातील सर्वच्या सर्व शासकीय रुग्णालयात एकही जागा शिल्लक नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोनाची बाधा होण्यापासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी नियमीतपणे मास्क वापरणे आणि तो वेळेवर धुवून स्वच्छ करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात व तोंड वेळोवेळी साबणाने धुणे, दररोज गरम पाणी पिणे, पाण्याची वाफ घेणे, या गोष्टी दररोज न चुकता कराव्यात, असे आवाहन तालुका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. भोर तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता आणि आपल्या सर्वांच्या पुढील भविष्यासाठी अगामी २३ जुलै ते ३१ जुलै या कालावधीतील लॉकडाउनमध्ये घरातच बसून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले.

भोर तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती  
एकून कोरोनाग्रस्त- १२९
उपचार घेत असलेले रुग्ण- ४६
उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण- ८३
स्वॅब तपासलेले नागरिक- ४९५

नसरापूर : नसरापूर येथील एल अँड टी कंपनीच्या कार्यालयात पुणे येथtन येणारया एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. नसरापूर येथे त्या कर्मचाऱ्याचा संपर्क आल्याने प्रशासनाने नसरापूर गाव प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे.

नसरापूर येथे एल अँड टी कंपनीचे कार्यालय असून, या ठिकाणी सहा कर्मचारी काम करीत आहेत. बाधीत झालेला कर्मचारी गेले अनेक दिवस पुणे येथील घरामधूनच काम करत होते. शनिवारी काही कामानिमित्त ते नसरापूर येथील कार्यालयात आले होते व अस्वस्थ वाटल्याने त्यांनी सोमवारी तपासणी करून घेतली असता कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले कार्यालयात याबाबत त्यांनी माहिती दिल्यावर भोर प्रशासनास कळवले.

या कर्मचाऱ्याचा नसरापूर येथे संपर्क आल्याने भोर प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव यांनी नसरापूर गाव प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत असून, इतर कोण संपर्कात आले आहे काय, याची माहिती घेण्यात येत आहे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT