corona  
पुणे

जुन्नरला तीन दिवसांनंतर कोरोनाची पुन्हा एन्ट्री, मात्र... 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील तीन दिवसांनंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. 
 

जुन्नर, धामणखेल, राजुरी व नवलेवाडी येथील कोरोनाबधितास आज (ता. १९) घरी सोडण्यात आले. त्यामुळे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. जुन्नरला फटाके वाजवत व फुलांची उधळण करत औक्षण करून कोरोनावर विजय मिळविलेल्या रुग्णाचे स्वागत करण्यात आले.   

सध्या ओतूर, कुसुर व बोरी येथील तीन जण उपचार घेत असून, ३० जण बरे झाले आहेत, तर औरंगपूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बोरी येथील संबंधित रुग्ण मुंबईहून दोन महिन्यांपूर्वी आला होता. त्यास न्यूमोनिया सदृश्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्याला पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचे पहिले दोन्ही स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले होते, तर तिसरा पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या वाढली आहे
.

गावनिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे :  डिंगोरे- १  (बरा), सावरगाव-  ५ (बरे), मांजरवाडी- २ (बरे), पारुंडे- ३  (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे), धालेवाडीतर्फे मिन्हेर- १ (बरा), विठ्ठलवाडी वडज- १ (बरा), शिरोलीतर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा), कुरण- १ (बरा), चिंचोली- ३ (बरे), ओतूर- १ (बरा), जुन्नर- १ (बरा), राजुरी- १(बरा), नवलेवाडी- १ (बरा), धामणखेल- १ (बरा). मृत्यू : औंरगपूर- १ (मृत्यू), एक्टिव्ह :
ओतूर- १, कुसूर- १, बोरी- १. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT