corona
corona 
पुणे

जेजुरीत कोरोनाची पुन्हा एन्ट्री...पुरंदर दीड शतकाच्या उंबरठ्यावर

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे)  : पुरंदर तालुक्यातील जेजुरीत दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. तसेच, तालुक्यातील गराडे येथेही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्याची आजच्या तीन रुग्णांसह संख्या 149 झाली आहे. एकट्या सासवड शहरात कालच्या 20 पाॅझिटिव्हसह 101 वर गेल्याने काळजी वाढली आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड शहराने केवळ या दोन आठवड्यात पुन्हा उसळी मारली आहे. शहरात कोरोना पाॅझिटिव्ह बरेच सापडले आहेत. तर, ग्रामीणमधील वेगही या आठवड्यात वाढला आहे. तालुक्यातील तब्बल 25 गावात कोरोना संसर्ग पोचला आहे. तर, कोरोनामुळे काल पाचवा बळी सुप्यात गेला. परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकप्रतिनिधींकडून प्रशासकीय मंडळींची तातडीची बैठक सासवडला झाली. सासवड शहराची परिस्थिती गंभीर बनली आहे. लाॅकडाऊन पुढे वाढविला नाही; आणि पुणे कनेक्शनधून संसर्ग रोखला नाही.. तर नियंत्रण राहणार नाही; हे स्पष्ट आहे.

शहरातल्या एकुण 101 मधील एकट्या लांडगे गल्लीचेच चाळीस टक्के रुग्ण आहेत.  प्रत्येक घरात पोचून सर्वेक्षण व कोविड तपासणी का केली जात नाही, असा सवाल लांडगे गल्लीतील जाणकार तरुणांनी आज केला. तालुक्यात एकट्या सासवडचे 70 टक्के रुग्ण आणि सासवडला एका लांडगे गल्लीचेच 40 टक्के रुग्ण झाले आहेत. यावर लक्ष केंद्रीत करीत आहोत, असे पालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्पष्ट केले. 

यानिमित्ताने आमदार संजय जगताप म्हणाले की, सासवड शहरातील सर्वच लोकांनी सुजाणपणा दाखवावा, निष्काळजी लोकांनी शहाणे व्हावे. कोरोनाबाबतची शिस्त बारकाईने अंमलात आणा. नाहीतर माफी नाही. या वेळी तहसीलदार रुपाली सरनौबत, सासवड पालिका मुख्याधिकारी विनोद जळक, तालुका गट विकास अधिकारी मिलिंद टोणपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
दरम्यान, गुरोळी, मांढर, सासवड, धनकवडी पाठोपाठ काल सुपे खुर्दमधील एका कोरोनाबाधितचा मृत्यू झाला. परवा रात्री केतकावळे येथील कोरोना पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात एकाचा मृत्यू झाला. पण, तो कोरोना तपासणीत निगेटिव्ह ठरला आहे. सासवडचा लाॅकडाउन थोडा फायदेशीर ठरतोय, असे वाटत असताना शहराने पुन्हा उसळी मारली.  त्यातून सासवड शहरातील लाॅकडाउन पंधरा दिवस पुढे नेण्यासारखी दुसरी उपाययोजना हातात नाही. तसेच, पुणे व बाहेर गावाहून ये- जा करणारांना होम क्वारंटाइन पद्धतीत रोखले तर अजून नियंत्रण मिळण्याच्या आशा आहेत. ग्रामीण भागातील 25 गावांत कोरोनाचा शिरकावा झाला आहे. तोही त्या गावात नियोजन करून रोखला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT