corona1
corona1 
पुणे

पुण्यात लग्नाला गेलेल्या बहिण- भावाला मिळाला कोरोनाचा आहेर

युनूस तांबोळी

टाकळी हाजी (पुणे) : पुण्याजवळील लोहगाव येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील बहिण- भावाचा कोरोनाचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॅा. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 
 
कवठे येमाई येथील बहिण- भाऊ आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी लोहगाव (पुणे) येथे गेले होते. त्या लग्नामध्ये कोरोनाबाधित असलेल्या नवरदेवामुळे 50 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या भाऊ- बहिणीचाही स्वॅब घेतल्यानंतर त्यांचा अहवाल देखील पॅाझिटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॅा. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 

कवठे येमाई गावामध्ये या पूर्वीही पाच रुग्ण सापडले होते. त्यामुळे भितीचे वातावरण तयार होऊन गाव बंद झाले होते. गावातील गतिमंद 3 जणांना शाळेत क्वारंटाइन केले होते. या वेळी गावातील तरुणांनी गाव बंद केले होते. त्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव होण्यास मज्जाव झाला होता. परिसरातून या तरुणांचे स्वागत केले जात होते. त्यानंतर गावात व्यवहार सुरळीत सुरू होण्यास मदत झाली. गावातील लहान मोठे व्यवसाय सुरू होऊन आर्थिक परिस्थिती सुरळीत होईल, अशी आशा नागरिकांमध्ये होऊ लागली होती. मात्र, अचानक लग्नाला गेलेले भाऊ- बहिण कोरोना पॅाझिटिव्ह सापडल्याने सध्या गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे. 

याबाबतची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे, सरपंच अरुण मुंजाळ, ग्रामविस्तार अधिकारी संतोष गायकवाड, दिपक रत्नपारखी, शांताराम पोकळे, डॅा. कुंडलीक शितोळे, रितेश शहा यांनी निर्णय घेऊन गावात औषध फवारणी सुरू केली.    

दरम्यान, शिरूर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवंसेदिवस वाढत आहे. लग्नसंमारंभ व इतर सार्वजनीक कार्यक्रमांना मोठा जनसमुदाय जमवून शारीरिक अंतराचा फज्जा उडवला जात आहे. त्यामुळे नागरिक नियमात एकत्रित येत नसतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे शिरूरचे उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख यांनी सांगितले.  या वेळी रांजणगाव व पाबळ येथील पोलिस खात्यातील अधिकारी उपस्थीत होते.  
 
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT